आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग नव्हता, हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे व्यक्तीगत मत आहे. ते पक्षाचे मत नाही. रामजन्मभूमी आंदोलनात बाळासाहेबांचे मोठा सहभाग व विचार होता. शिवसैनिक व कारसेवकांची मोलाची भूमिका होती,अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.
बाबरी वक्तव्यावर प्रतिक्रीया
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग नव्हता,असे वक्तव्य केले होते. त्याबाबत पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांच्या मुलाखतीचा तो व्हिडिओ बघितला नाही. तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्या प्रश्नाचे उत्तर देईल,असे म्हणत बावनकुळे यांनी उत्तर देणे टाळले होते.
पत्रकार परिषदेनंतर जळगावातच असलेल्या बावनकुळे यांना पत्रकारांनी पुन्हा तोच प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या रामजन्मभूमी आंदोलनातील सहभागाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले बावनकुळे?
रामजन्मभूमी आंदोलनात बाळासाहेब ठाकरे व कारसेवक हे वेगवेगळ्या पक्षाचे होते. किंबहुना त्या ठिकाणी राज्यातून आले होते. आंदोलनात बाळासाहेब ठाकरे होतेच. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्तीगत भूमिका मांडली. ती पक्षाची भूमिका नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी बरोबरीचा पक्ष नाही
राष्ट्रवादी हा भाजपच्या बरोबरीचा पक्ष नाही.त्यामुळे त्याचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केला काय आणि राहिला काय? भाजपला फरक पडत नाही. राष्ट्रवादी स्वबळावर राज्यात शंभर आमदार निवडून आणू शकला नाही.स्वबळावर त्यांची सत्ता आली नाही,असे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. संजय राऊतांना उत्तर देण्यासाठी भाजपचे आठ प्रवक्ते नेमले.
आठ पक्ष प्रवक्ते नेमले
सकाळ झाली की एक भोंगा सुरु होतो. तो वाजतच आहे. खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मी आठ पक्ष प्रवक्ते नेमले असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.