आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चातुर्मास अन‌् आपत्कालीन काळातही 14 मुहूर्त; विवाह सोहळ्यांना 8 जुलैपासून 140 दिवस मिळणार ब्रेक

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा डिसेंबरपर्यंत ६४ विवाहांचे मुहूर्त आहेत. यात जून, जुलै अखेर दोन महिन्यात १४ मुहूर्त आहेत. या दोन महिन्यांत ८ जुलै नवमीचा शेवटचा मुहूर्त आहे. त्यानंतर चातुर्मासाला सुरुवात होत असल्याने १४० दिवसांसाठी विवाहांना ‘ब्रेक’ लागणार आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबरपासूनच शहनाई वाजेल. मात्र, यात काही गौण, चातुर्मास व आपत्कालीन काळातीलही विवाह मुहूर्त असल्याचे भूषण जोशी धुळेकर गुरुजींनी सांगितले.

२८ सप्टेंबर रोजी शुक्राचा पूर्वेला अस्त आणि २६ नोव्हेंबरला पश्चिमेला उदय झाल्यावर पुन्हा विवाहांना सुरुवात होईल. मात्र, अपवादात्मक स्थितीत गौण, चातुर्मास व अपत्कालीन काळात विवाह मुहूर्तही आहेत. असे मुहूर्त जुलै ते डिसेंबर दरम्यान प्रत्येक महिन्यात आले आहेत. मात्र, चातुर्मासानंतर २६ नोव्हेंबरला पश्चिम दिशेला शुक्राचा उदय झाल्यानंतरच विवाह होऊ शकतील. जून ते डिसेंबरदरम्यान ६ दिवस विवाहांच्या सर्वाधिक शुभ तिथी आहेत. या अनुषंगाने ज्यांची लग्न जुळलेली आहेत त्यांनी सनई-चौघडा वाजवण्याची तयारी केली आहे. यंदा आॅगस्ट महिन्यात नऊ विवाह मुहूर्त आहेत.

जानेवारी ते मे अखेर लगीनघाई : शहरात जानेवारी ते मेच्या अखेर शेकडो विवाह पार पडले. यात सर्वाधिक लग्न एप्रिल-मेमध्ये झाले. या दरम्यान शहरातील सर्वच लॉन, मंगल कार्यालये, मॅरेज गार्डन, हॉटेल, गल्ल्यांचा लग्नकार्यासाठी उपयोग करून घेण्यात आला असल्याचे दिसते.

बातम्या आणखी आहेत...