आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्याची काळजी:केमिकलयुक्त रंगांचा पोस्ट कोविड रुग्णांना होऊ शकतो फुप्फुसाचा त्रास, बाहेर पडू नका

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नैसर्गिक रंगांची उधळण होत असेल तरच लुटा आनंद : वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

दोन वर्षांनंतर यंदा धूलिवंदनाचा सण हा उत्साहात साजरा होणार असला तरी कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांनी केमिकलयुक्त रंगांपासून सावधान राहावे. कोरोना झालेल्या व्यक्तींचे फुप्फुस हे काहीअंशी निकामी झाले असून, केमिकलयुक्त रंग अथवा या रंगाचे पाणी शरीरात गेल्यास त्यांना याचा अधिक त्रास उद्भवण्याचा धोका आहे.

ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांना फुप्फुसाचे आजार जडले आहेत. कोरोनामुळे या नागरिकांच्या फुप्फुसाची क्षमता ही कमी झाली आहे. त्यातच केमिकलयुक्त रंग हे घातक असल्याने त्याचा त्वचेसह फुप्फुसालाही अधिक धोका आहे. नाका-तोंडाद्वारे हे रंग शरीरात गेल्यानंतर रुग्णाला श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊन पुन्हा न्यूमोनिया व कोरोना होण्याचा धोका अधिक आहे.

नैसर्गिक रंगांनी खेळा होळी
रंगांमुळे पोस्ट कोविड आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने होळी खेळताना अधिक काळजी घ्यावी. नैसर्गिक रंगांचा वापर करावा. मास्क लावल्यास रंग शरीरात जाणार नाही. -डॉ. भाऊराव नाखले, जीएमसी

त्रास जाणवल्यास डॉक्टरांना भेटा
होळी खेळताना रंगांमुळे जर कोणाला त्रास जाणवल्यास अथवा रंगाचे पाणी तोंडात गेल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. जेणेकरून त्यावर लवकर योग्य उपचार करणे शक्य होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...