आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासाचे स्मरण:शोभायात्रेतून छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष, लेझीमच्या प्रात्यक्षिकांमुळे रंगत ; जयंती उत्सव समितीने वेधले लक्ष, शिवतीर्थाजवळ जल्लाेषात झाला समारोप

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे जयंती उत्सव समितीतर्फे शनिवारी सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. खान्देश सेंट्रल मॉलपासून शोभायात्रेस सुरुवात झाली. सजवलेल्या वाहनांवर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे यांच्यासह स्वराज्याचा इतिहास सांगणारे फलक लावण्यात आले होते. आमदार सुरेश भोळे यांनी प्रतिमापूजन केले. मराठा समाज आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. सचिन पाटील, प्रा. आर. व्ही. पाटील, नंदू पाटील, मनोज मोहिते, किशोर पाटील, मनोज वाणी, योगेश पाटील, रेखा पाटील, वंदना पाटील, मनिषा पाटील, यशवंत पाटील, विजय देसाई, उदय पाटील यांच्यासह विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. ढोलताशांच्या गजरात लेझीमची प्रात्यक्षिके युवकांनी सादर केली. नेहरू पुतळा, टॉवर चौक, जुने बसस्थानकमार्गे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शोभायात्रेचा समारोप झाला. कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

सकल मराठा समाज

जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाज आरक्षण याचिकाकर्ते व आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी अजिंठा विश्रामगृहात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उद्योजक विजय देसाई, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, पीयूष पाटील, केतन पाटील, भगवान शिंदे, कृष्णा पाटील, किरण पाटील, आकाश पाटील, शुभम बारसे, भूषण पाटील उपस्थित होते.

निसर्गमित्र समिती

निसर्गमित्र समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला माजी ऊर्जा मंत्रालय सदस्य विकास वाघ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रा. वासुदेव पाटील, निसर्गमित्र समितीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, प्रा.मदन बनसोडे, रवींद्र पाटील, राजेंद्र वाघमारे व पदाधिकारी उपस्थित होते. युवा िब्रगेड संघटना अखिल भारतीय राजर्षी शाहू ब्रिगेड प्रणीत युवा ब्रिगेडतर्फे अध्यक्ष यश पाटील यांनी प्रतिमेचे पूजन केले. जिल्हाध्यक्ष सुमीत भंगाळे, अनिकेत सपकाळे यांनी संभाजी महाराजांच्या कार्याची माहिती दिली. संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय पाटील, दीपक कोल्हे, बादल राजपूत, सनी राजपूत, जयेश साळुंखे, तेजस भारंबे, गौरव सोनगिरे, सागर जाधव आदी या वेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...