आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:मुले पळवणारी टाेळीचे मेसेज जुने ; जिल्हा पाेलिस

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाज माध्यमावर गेल्या काही दिवसांपासून ‘मुले पळवणारी टाेळी’ या आशयाचे मेसेज फिरत आहेत; परंतु हा मेसेज जुना आहे. शहरातील एमआयडीसी पाेलिस ठाण्याबाबतही असाच मेसेज फिरत आहे. अशी काेणतीही स्थिती नाही. पाेलिस विभागातर्फे साध्या वेशातील कर्मचारी अशा गाेष्टींवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता केवळ दक्ष राहावे. तसेच विनाकारण संशयित म्हणून निर्दोष व्यक्तींना मारहाण करू नये, असे आवाहन पाेलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी केले आहे.

शिकारे यांनी म्हटले की, चोपडा शहर तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी आली असून, अमूक अमूक ठिकाणाहून मुले पळवून नेली असल्याबाबत सांगितले जात आहे. हा संदेश काळजीपूर्वक बघितला असता जवळपास सारखेच असून, केवळ गाव, शाळा, मुलाचे नाव बदललेले दिसून येत आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणताही अनुचित प्रकार आढळून आलेला नाही. तसेच मागील काही वर्षाचा रेकॉर्डदेखील चेक केले आहे अशा कोणत्याही अप्रिय घटनेची नोंद नाही. तसेच फिरत असलेल्या संदेशानुसार महाराष्ट्रात कुठे गुन्हे दाखल असल्याचे देखील ऐकिवात नाही.

प्रशासन म्हणून पोलिस या संदेशाबाबत गंभीर असून, शाळेच्या ठिकाणी साध्या गणवेशात गस्त यापूर्वीच सुरू केली आहे. तसेच शाळा प्रशासनाशी संपर्क करून त्यांना देखील सतर्क व सजग राहण्याचे व खबरदारी बाळगण्याचे कळवण्यात आले आहे. काही माहिती मिळाल्यास पाेलिस ठाण्यात किंवा ११२ या क्रमांकावर कळवावे. कोणत्याही संदेशावर डोळे बंद करून विश्वास न ठेवता त्याच्या सत्यतेची खात्री करा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला परस्पर मारहाण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...