आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात राष्ट्रभक्ती चेतवण्यासाठी विश्वमांगल्य सभेच्या जळगाव शाखेकडून गेल्या दाेन वर्षांपासून लहान मुलांसाठी बालसभा, छात्रसभा उपक्रम राबवला जाताे आहे. आता महाविद्यालयीन तरुणींसाठी छात्रसभा घेण्यात येते आहे. अमरावती येथील जितेंद्रनाथ महाराज यांनी बारा वर्षांपूर्वी या संस्थेची मुहूर्तमेढ राेवली. आज तिला व्यापक स्वरूप येते आहे. संस्कार, कुटुंबवत्सल नातेसंबंध दृृढ करण्याचा उद्देशही त्यातून साध्य हाेताे आहे. लहान मुलांसाठी महिन्यात दोन रविवारी योगा, प्रज्ञा विवर्धन, रामरक्षा स्ताेत्र पाठांतर आणि त्याचा अन्वयार्थ समजावून मार्गदर्शन केले जाते आहे. मुलांमध्ये राष्ट्र समर्पणाची भावना निर्माण व्हावी यासाठी वर्षातून एकदा प्रेरणा प्रसार कार्यक्रम घेण्यात येतो. त्यात महापुरुषांच्या या कथा सांगितल्या जातात. हे कार्यक्रम नि:शुल्क असूून शहरात इतर भागांत सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शाखेच्या अध्यक्षा वंदना गर्गे, उपाध्यक्षा माजी महापौर सीमा भोळे, सचिव राधा अपराजित, मोहिनी भंडारे व स्नेहा कोष्टी या काम पाहत आहेत. संपर्क केल्यास आवश्यक तेथे बालसभा, छात्रसभा सुरू करण्यात येतील, असे अध्यक्षा गर्गे यांनी कळवले आहे. सध्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी दूध फेडरेशन परिसरात मिथीला अपार्टमेंट व श्रीकृष्ण कॉलनी मंदिर येथे बालसभा सुरू आहेत.
नीट असावे, नीट दिसावे : महाविद्यालयीन तरुणींमध्ये संस्कार रुजवण्यासाठी ‘नीट असावे, नीट दिसावे’ या संकल्पनेवर आधारित उपक्रम सुरू होणार आहे. त्यात राष्ट्रासाठी तरुणींनी एकत्र यावे, कुटंुबाची बिघडलेली घडी व्यवस्थित करण्यासाठी कार्य केले जाते आहे. सुसंस्कारित माता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरुणींना संस्कृतींची ओळख व्हावी यासाठी, सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे, असे आयाेजकांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.