आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मुलांचा बुडून मृत्यू:मंत्री गुलाबराव पाटलांची प्रत्येकी 10 हजारांची मदत; कुटुंबियांशी भेटून केले सांत्वन

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शिरसोली येथील पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला असून या दोन्ही कुटुंबियांची आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रूपयांची वैयक्तीक मदत देखील केली.

तालुक्यातील शिरसोली येथील मुले हे जवळच असलेल्या धारागीर येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. यात निलेश राजेंद्र मिस्त्री (वय-17) आणि श्रवण शिवाजी पाटील (वय-15) या दोन मुलांचा तलावाच्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने शिरसोली परिसरावर शोककळा पसरली आहे. या दोन्ही मुलांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी उशीरा अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंत्री गुलाबराव पाटील हे काल मुंबईत असल्याने त्यांनी मोबाईलवरून या दुर्घटनेची माहिती जाणून घेतली होती. मुंबईवरून परतल्यानंतर त्यांनी दोन्ही मयत मुलांच्या कुटुंबियांची शुक्रवारी शिरसोली येथे जावून भेट घेतली. मुलांच्या निधनाबद्दल दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांना धीर दिला.

यातील मयत निलेशच्या पश्चात वडील राजेंद्र एकनाथ मिस्तरी, आई व बहिण असा परिवार आहे. तर श्रवणच्या पश्चात वडील शिवाजी रामकृष्ण पाटील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. श्रवणच्या आईचे दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले असून आता त्याच्या निधनाने पाटील कुटुंबावर वज्राघात झाला आहे. गुलाबराव पाटील यांनी दोन्ही कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी बळ मिळावे अशी प्रार्थना केली. मुलांच्या मृत्यूबाबत सहवेदना व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी स्वत:कडून दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रूपयांची मदत देखील केली. याप्रसंगी गुलाबराव पाटील यांच्यासोबत पंचायत समितीचे माजी सभापती नंदलाल पाटील, सरपंच हिलाल भिल्ल, माजी सरपंच प्रदीप पाटील, अनिल पाटील, माजी उपसरपंच श्रावण ताडे, शेणफडू पाटील, ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर ढेंगे, बापू मराठे, उमाजी पानगळे, प्रकाश मराठे, भगवान पाटील यांच्यासह शिरसोली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...