आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडाचा झेंडा:चिमणराव पाटील, किशोर पाटील; लता सोनवणेंच्या भूमिकेकडे लागले लक्ष

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाचोरा, एरंडोल, चोपड्याला कोट्यवधींचा निधी दिल्याने तिघे आमदार शिंदेंच्या गोटात

गेल्या दोन वर्षांत पाचोरा, एरंडोल व चोपडा या शिवसेनेच्या तीनही आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षात कोट्यवधीचा निधी दिल्याने अनेक विकास कामे सुरु झाली. आतापर्यंत एवढा निधी या आमदारांना कधीही मिळाला नव्हता. त्यामुळे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, चिमणराव पाटील व लता सोनवणे हे तीनही आमदार शिंदेंच्या गोटात दाखल झाले आहेत. भविष्यात शिंदे यांना मोठे पद मिळाल्यास अशीच कोट्यवधीची कामे मार्गी लागतील असा या आमदारांना श्विस असल्याने तिन्ही आमदारांनी शिंदेंना साथ दिल्याचे दिसून येत आहे.

पारोळ्यासाठी ५६ कोटींची पाणी योजना मंजूर केली : वर्षभरात आमदार चिमणराव पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी पारोळा शहरासाठी ५६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. विविध रस्ते व इतर कामांसाठी ९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच शहरासाठी १५ कोटी रुपयाचे नाट्यगृह प्रस्तावित आहे. एरंडोल शहरासाठी देखील २८ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, १४ कोटी रुपयाचे रस्ते व इतर कामे तसेच पाच कोटी रुपयांचे सांस्कृतिक सभागृह, पाच कोटींचा कासोदा दरवाजा ते पुरा भाग पर्यंत रस्ता व पाच कोटी रुपयांचे चौक सुशोभिकरण, नदीच्या सुशोभिकरणासाठी १० कोटी, उद्यानांसाठी ५ कोटी अशा विविध योजनांना मान्यता या शिंदेंकडून देण्यात आलेल्या आहेत.

पाचोऱ्यातील ५५ खुल्या भूखंडांसाठी मोठा निधी : शिंदे यांनी पाचोरा नगरपरिषदेला हिवरा नदीवरील तीन पूल, रस्ते,गटारी, शहरातील ५५ खुल्या भूखंडांच्या सुशोभिकरणासाठी मोठा निधी, विस्तारित कॉलन्यांमध्ये व शहरात भुयारी गटारी, हिवरा नदीपात्रातील राम मंदिराच्या सुशोभिकरणासाठी निधी असे ७० ते ८० कोटी दिले. त्यामुळेच किशोर पाटील हे शिंदे यांच्या गोटात सामील झाल्याचे बोलले जात आहे.

चिमणराव पाटीलहीहोते नाराज
आमदार चिमणराव पाटील सोमवारी सायंकाळी सुरत रवाना झाल्याची माहिती समोर येतa आहे. डॉ.हर्षल माने यांच्या जिल्हाप्रमुख निवडीला विरोध करूनही नियुक्ती कायमहोती. म्हणून ते नाराज होते. शिंदे यांच्या संपर्कात येऊन त्या गोटात ते दाखल झाल्याची चर्चा आहे.

किशोर पाटलांच्या घरी शुकशुकाट
पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटलांचे “सिंहगड” निवासस्थान भडगाव रोडवरील चिंतामणी कॉलनी येथे असून, या निवासस्थानी सकाळ पासूनच पदाधिकारी व कार्यकर्ते फिरकले नाही. दिवसभर शुकशुकाट होता. आमदार पाटील यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी गेलेले नाही.

वर्षभरात शिंदे दोनवेळा पाचोऱ्यात
किशोर पाटील यांनी १० जुलै २०२१ रोजी पाचोरा येथील स्व.के. एम.बापू पाटील मार्केट, हिवरा नदीवरील तीन पुलांचे उद्घाटन व अन्य विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनासाठी शिंदे पाचोऱ्यात आले होते. १९ आक्टोबर २०२१ रोजी हेलिकॉप्टरने जळगावातही आलेहोते.

पाचोरा-भडगाव मतदारसंघात ७० कोटींची कामे
पाचोरा-भडगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचे व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे गेल्या दोन वर्षांपासून अतिशय जवळचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत पाचोरा व भडगाव नगरपरिषदेत सुमारे ७० ते ८० कोटींचा निधी त्यांनी मंजूर केला. आमदार किशोर पाटील हे दर मंगळवारी व बुधवारी मुंबईत थांबून नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडून विकास कामे मंजूर करून आणत असत. निधी उपलब्ध झाल्यानंतर विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनासाठी त्यांना ते पाचोऱ्यात बोलवत असायचे.