आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास कोर्टाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा व 5 हजार रुपयांच्या दंड

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्याचाराच्या गुन्ह्यात ७ वर्षांची शिक्षा भोगून आलेल्या एका आरोपीने खाऊचे आमिष देऊन पुन्हा पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या आरोपीस दोषी धरून मरेपर्यंत जन्मठेप व ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने गुरुवारी ठोठावली. संदीप सुदाम तिरमली (वय ३६, रा. शिरसगाव ता. चाळीसगाव) असे आरोपीचे नाव आहे. सुदीप याने एका मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. ही शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने ३ जानेवारी २०२१ रोजी चाळीसगाव तालुक्यातील एका ५ वर्षीय मुलीस खाऊ देण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात अत्याचार केला. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संदीपच्या विरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन तासात पोलिसांनी त्याला अटक केली. तपासाधिकारी हेमंत शिंदे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यानंतर न्यायाधीश डी.एन. खडसे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षाने सहा साक्षीदार तपासले. सुनावणीअंती न्यायालयाने संदीप याला दोषी धरून शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी देविदास कोळी, केसवॉच दीपक महाजन यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...