आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या विविध शासन निर्णयांचा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पाढाच वाचला. त्यांनी भाषण न करता उपस्थित महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गुजरातमध्ये उद्योग पळवले, असा आरोप होतोय, त्याचे किती जणांना उत्तरे दिली, यासह इतर विचारलेल्या प्रश्नांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानंतर अगं बोला की, झोपल्या का? असे म्हणून वाघ यांनी महिला कार्यकर्त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला.
जळगाव शहरात आयोजित भाजप महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वाघ बोलत होत्या. या कार्यक्रमात कर्तृत्वान महिलांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार सुरेश भोळे, माजी जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, डाॅ.राधेश्याम चौधरी, दिपक सूर्यवंशी, दिप्ती चिरमाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
ही महाराष्ट्राची संस्कृती
आमदार सुरेश भोळे यांच्यामुळे कार्यक्रमाला उशीर झाल्याचे सांगत रस्त्यावरच्या प्रत्येक सामान्य माणसाशी असलेल्या संपर्काबद्दल वाघ यांनी कौतुक केले.राजकारणात काहीही बोलायचे नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.आम्हाला नंगाड भाषा बोलायला येत नाही.
मी असे कधीच म्हटले नाही
महाराष्ट्रात होत असलेल्या विनयभंग, अत्याराच्या घटनांवर आंदोलने केली, मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या. आता तुमचे सरकार आले आहे. आता विनयभंग होतात का? असा प्रश्न विचारला जातो. भाजपचे सरकार आल्यावर विनयभंग,अत्याचार होणार नाहीत,असे कधी म्हटले नव्हते, असेही वाघ म्हणाल्या.
तोही सोशल मीडियावर टाका..
मोदी यांनी व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांचा प्रचार प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी केले.पार काळ्या कुत्र्यासोबत फोटो काढला तरी सोशल मीडियावर टाका,हे सांगताना वैयक्तीक फोटो न टाकण्याचेही आवाहन केले.
हे विचारले महिला कार्यकर्त्यांना प्रश्न
शौचालये कुणी दिली,कोरोनात धान्य,जनधन योजनेत 500 रुपये,कोरोनात मोफत लस कुणी दिली? असे प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना विचारले. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानंतर अंग बोला की,तुम्ही झोपल्यात का? तुम्ही बोलणार नाहीत तर जय हिंद जय महाराष्ट्र करते,असे म्हणत त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. गॅस कुणी दिला हा प्रश्नही विचारला.गॅस दरवाढ झाल्याचे अनेकजण प्रश्न विचारत आहेत.त्यांना गॅसचे भाव नाही वाढायला पाहिजे होते,असे उत्तर द्या, असेही त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.