आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य करीत असल्याच्या प्रश्नांवर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी घुमजाव केले.आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याची पत्रकार परिषद बघितली नाही.त्यांनी दिलीगिरी व्यक्त केल्याचा व्हिडिओ बघितला. जे माहिती नाही त्याविषयी कसे बोलणार? माझ्यासोबतही असे प्रकार झाले. बोलले जाते काही दाखवले जाते काही,असे म्हणत त्यांनी घुमजाव केले.
प्रदेशाध्यक्षा वाघ या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आहेत. त्यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. आमदार सुरेश भोळे, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, दिपक सू्र्यवंशी, दिप्ती चिरमाडे आदी उपस्थित होते.प्रत्येक प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेले असून त्यांचे उत्तर तेच आमचे उत्तर असल्याचे त्या म्हणाल्या.पक्षातील नेते महिलांबद्दल बोलल्याबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला.तो जुना विषय असल्याच्या त्या म्हणाल्या.भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा प्रश्न त्यांनी खासदार संजय राऊत यांनी महिलेविषयी केलेले वक्तव्य,ठाकरे सरकारच्या काळात एका महिलेच्या वाहनात ठेवण्यात पिस्तुल ठेवण्यात आली,तो महिलांचा सन्मान होता का? असा प्रश्न उपस्थित केला.छत्रपती शिवाजी महाराजांचे चंद्र,सूर्य असेपर्यंत अढळ स्थान आहे.
राजकारणातील असो किंवा बाहेरचा,सर्वांनीच महिलांना आदर केला पाहिजेत.संजय राठोड यांना मंत्रीपद मिळण्यास विरोध केला.तो आता मावळला का? या प्रश्नांवर चित्रा वाघ विरुध्द महाराष्ट्र सरकार अशी याचिका दाखल करण्यात आलेली आहे.न्यायालयात लढाई सुरु आहे.न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.विधानसभा निवडणुकांचे एक्झीट पोलमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याबाबत विचारले असता सबका साथ सबका विकास म्हणत वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.
मात्र, दिल्लीतील मनपात भाजपची सत्ता जाणार असल्याचेही एक्झीट पोल सांगत असल्याचे विचारताच दिल्ली मनपात भाजपची सत्ता असल्याचे माहिती नसल्याचेही त्या म्हणाल्या. उध्दव ठाकरेंची हौस फिटल्याने त्यांनी महिला मुख्यमंत्री हा मुद्दा काढला आहे. आमच्या पक्षात सर्वाधिक महिला आमदार आहेत. त्यापैकी महिला मुख्यमंत्री झाल्यास आनंदच आहे. महिला मुख्यमंत्री झाल्यास सर्व प्रश्न सुटतील,या विचाराची नाही,असे वाघ म्हणाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.