आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाथार वाणी समाज सेवा संघातर्फे संत तुकाराम महाराज बीज महोत्सवानिमित्त गुरुवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यंदाच्या शाेभायात्रेत संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन, छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज भेट, अभंग गाताना व ग्रंथ इंद्रायणीत बुडतानाच्या चित्रमय देखाव्याचा रथ हे आकर्षण ठरले. तसेच महापुरुषांच्या सजीव आरास, टाळकरी, लेझीम महिला पथकाने लक्ष वेधून घेतले हाेते. रॅलीत महिलांची देखील मोठी उपस्थिती हाेती. संत तुकाराम महाराज बीज महोत्सवानिमित्त सकाळी ८.३० वाजता नागो गणू वाणी मंगल कार्यालयात संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात अाले. सायंकाळी ६ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात शोभायात्रेत कलश व तुळशीधारी महिलांसह सजीव देखाव्यांनी रंगत आणली. शोभायात्रेत सजवलेली बग्गी, घोडे, विद्युत रोषणाईने सज्ज रथ, संत, कर्तृत्ववान महिला व पुरुषांच्या वेशभूषेतील महिला व पुरुषांचे सजीव देखावे लक्ष वेधून घेत होते.
यात विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन असलेले बग्गीतील संत तुकाराम महाराज, घोड्यावर आरूढ असलेले छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी, आद्य स्त्री समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती सांगणारे देखावे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. महिला लेझीम पथक, पुरुषांचे लेझीम पथक, टाळकरी महिला पथक, बॅण्ड पथक, ढोल-ताशे, डीजे, सजवलेली बैलगाडी आदी पथकांच्या तालात समाज बांधवांसह महिलांनी जल्लोष केला. नवीपेठेतून टॉवर चौक, सुभाष चाैक, रथ चौक, राजकमल चौकमार्गे परत अालेल्या शाेभायात्रेचा रात्री ८ वाजता वाणी समाज मंगल कार्यालयात समारोप झाला. शोभायात्रेनंतर १२०० नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती काथार कंठहार वाणी समाज सेवा संघाचे अध्यक्ष अजय कामळस्कर यांनी दिली. शोभायात्रा व महाप्रसादासाठी विजय वाणी, सतीश वाणी, वासुदेव वाणी, मुकुंदा वाणी, अरविंद वाणी, पुरुषोत्तम वाणी, भूषण हरणे, भालचंद्र वाणी यांच्यासह समाज बांधवांनी सहकार्य केले.
यांनी साकारले हाेते देखावे
शोभायात्रेत मोनाली कामस्कर फाउंडेशनने संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन, छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज भेट, काथार युवा वाणी समाज सेवा संघ, मेहरूण युवा मंडळ यांचा अभंग गाताना व ग्रंथ इंद्रायणीत बुडतानाचे चित्रमय देखावा, फ्रेंड सर्कलने तुकाराम महाराजांची बग्गीतील सजीव देखावा हे आकर्षण ठरले होते.
मार्गात लावले स्टॉल
शाेभायात्रेच्या मार्गावर नवीपेठेत सतीश वाणी यांच्याकडून सरबताचे वाटप, टॉवर चौकात मोनाली कामळस्कर फाउंडेशनकडून पाणी वाटप, घाणेकर चौकात युवा ग्रुपतर्फे नाष्टा व पाण्याची व्यवस्था, सराफ बाजारात अजित वाणी यांच्याकडून बिस्किटाचे वाटप तर रथ चौकात फ्रेंड सर्कल ग्रुपकडून सरबताचे वाटप करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.