आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑक्सिजन प्लांट:चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटसाठी पाच डॉक्टरांकडून पाच लाखाची भरीव मदत

चोपडा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चोपडा येथील डॉक्टर बंधूंनी आज पाच लाख रुपयांचे धनादेश तहसीलदार अनिल गावित यांचे कडे दिलेत.

चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभा करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन सेवाभावी लोकांनी केल्यावर त्याला प्रतिसाद म्हणून चोपडा येथील डॉक्टर बंधूंनी आज पाच लाख रुपयांचे धनादेश तहसीलदार अनिल गावित यांचे कडे दिलेत. चोपडा येथील डॉ दिलीप पाटील व डॉ दीपक पाटील यांचे नृसिंह हॉस्पिटल, डॉ विकास हरताळकर व डॉ अमित आणि डॉ विनीत हरताळकर यांचे हरताळकर हॉस्पिटलचे आहे.

डॉ लोकेन्द्र महाजन यांचे चैतन्य हॉस्पिटल, डॉ शरद पाटील व डॉ भरत पाटील यांचे पाटील हॉस्पिटल, डॉ आनंद पाटील, डॉ हेमंत पाटील यांचे सुविचार हॉस्पिटल यांनी प्रत्येकी एक लाख रुपये असे पाच लाखाची मदत आज तहसीलदार अनिल गावीत याच्या कडे प्राप्त झाली असून यात मोठं काम उभं राहणार आहे. यावेळी चोपडा नगर पालिकेचे जेष्ठ नगरसेवक जीवन चौधरी, गटविकास अधिकारी भरत कासोदे , शेतकरी कृती समिती चे एस बी पाटील,नायब तहसीलदार महेश साळुंखे हजर होते.

बातम्या आणखी आहेत...