आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपडा:तुम्ही मुलीला विमानातून बाहेर काढले, आता जीवदानही द्या... दुर्घटनेतून बचावलेल्या महिला पायलटच्या वडिलांची आर्त हाक

चोपडा / प्रवीण पाटील2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चोपड्यानजीक कोसळले प्रशिक्षणार्थी विमान, एक ठार

चोपडा तालुक्यातील वर्डी गावापासून ७ किमी अंतरावर सातपुड्याच्या जंगलात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिरपूरच्या एका खासगी हवाई प्रशिक्षण केंद्राचे एक चार सीटर लहान विमान अचानक कोसळले. त्यात पायलट नूर अल अमीन (वय २८, रा. बंगलोर) जागीच ठार झाला तर महिला सहपायलट अंशिका लखन गुर्जर (वय २४, रा.खरगोन, मध्य प्रदेश) ही गंभीर जखमी झाली. वर्डी येथील आदिवासी बांधव रमेश बारेला हे सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. अंशिका विमानात अडकली होती. आदिवासी बांधव व वर्डीकरांच्या मदतीने त्यांनी तिला बाहेर काढले. तिला पाणी पाजले. तिच्या वडिलांशी संवाद साधून तिला धीर दिला. ते म्हणाले तुम्ही मुलीला विमानातून बाहेर काढले, आता जीवदानही द्या. त्यानंतर ३ कि.मी. पर्यंत झोळीत टाकून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवत तिचे प्राण वाचवले. राम तलाव ते वर्डी या साडेतीन किलोमीटरचा रस्ताही चिखलाचा होता. तीनवेळा रुग्णवाहिका चिखलात फसली. वर्डीच्या तरुणांनी सुकनाथ बाबांचा जयघोष करीत रुग्णवाहिकेला धक्का देत वर्डीपर्यंत पोहोचवले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार अनिल गावित, नायब तहसीलदार राजेश पउळ, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. मनोज पाटील, शहर पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, अडावद सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे हेदेखील घटनास्थळी पोहोचले. याशिवाय विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रवीण गुजराथी यांनी भेट दिली. यावेळी शिरपूर येथील निम्स महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचारीही मदतीसाठी उपस्थित होते.

सर्वप्रथम मदत कार्य करणाऱ्या रमेश बारेला : काही अंतरावर मृतावस्थेत पडलेला होता तर विमानात एक तरुणी अडकलेली होती. तिच्या डोक्यातून रक्तस्त्राव हाेत हाेता. सुमऱ्या, राजाराम, बिसन, एकनाथ व सैराम बारेलाच्या मदतीने तिला विमानातून बाहेर काढले, जमिनीवर बसवले. पायाला, डोक्याला व कमरेला मार लागल्याने तिला बसता ही येत नव्हते व बोलताही येत नव्हेत. पाणी पाजले. थोड्यावेळाने ती हिंदीतून बोलू लागली. तिने तिच्या कुटुंबीयांचा मोबाईल नंबर कसाबसा सांगितला. त्यावर संपर्क साधला असता तिच्या वडिलांशी संपर्क झाला. मी अपघाताची माहिती दिली. त्यानंतर अंशिकाही तिच्या वडिलांशी कशीबशी बोलली. त्यांनी तिला धीर दिला व मला तिचे प्राण वाचवण्यासाठी तत्काळ रुग्णालयात हलवण्याची विनंती केली. त्यानंतर रुमालांची झोळी करीत सहकाऱ्यांच्या व वर्डी येथील तरुणांच्या मदतीने ३ कि.मी. अंतर चिखलातून पायी चालत आलो. तोपर्यंत तेथे एक रुग्णवाहिका आली होती.

बातम्या आणखी आहेत...