आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारकी संकटात:चोपड्याच्या लता सोनवणे यांची आमदारकी संकटात, जात प्रमाणपत्र अवैध

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला त्यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. मात्र न्यायमूर्ती आर. डी. धानुका व न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांनी सोनवणेंची याचिका रद्दबातल ठरवली. त्यामुळे त्यांच्या आमदारकीवर पुन्हा टांगती तलवार आहे. मात्र सोनवणेंवर फौजदारी कारवाई करण्यात येऊ नये, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

चाेपडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सोनवणे यांनी टोकरे कोळी या ातीचे प्रमाणपत्र जाेडले होते. निवडणुकीत त्या विजयी झाल्या. राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांनी जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. नंदुरबारच्या प्रमाणपत्र तपासणी समितीनेही सोनवणेंचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यावर सोनवणेंनी खंडपीठात धाव घेतली. मात्र तिथेही त्यांची याचिका रद्दबातल ठरली.

बातम्या आणखी आहेत...