आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:चोपड्याची ‘मॅडम’ प्रथम, भुसावळची ‘मुंग्या’ द्वितीय

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. त्यात चोपडा येथील महात्मा गांधी संस्थेच्या महाविद्यालयाची “मॅडम’ ही एकांकिका प्रथम आली.

स्पर्धेचे उद‌्घाटन ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. सुशील अत्रे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील कुलकर्णी, विद्यापीठ प्रतिनिधी प्रा. डॉ. विजय लोहार, महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. राहुल संदानशिव, परीक्षक पीयुष रावळ, योगेश पाटील, अपूर्वा कुलकर्णी उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा एकांकिका स्पर्धेनंतर झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, उपप्राचार्य डॉ एन. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख, विद्यापीठ प्रतिनिधी प्रा. डॉ. विजय लोहार, प्रा. डॉ. राहुल संदानशिव, परीक्षक पीयुष रावळ, योगेश पाटील, अपूर्वा कुलकर्णी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. राजेंद्र देशमुख यांनी केले. डॉ. अफाक शेख यांनी आभार मानले. कोरोनाच्या काळानंतर झालेल्या या स्पर्धेला प्रतिसाद लाभला.

असा आहे स्पर्धेचा निकाल
प्रथम सांघिक एकांकिका : चोपडा येथील महात्मा गांधी महाविद्यालय : एकांकिका मॅडम, द्वितीय भुसावळ येथील नहाटा महाविद्यालय : एकांकिका मुंग्या, तृतीय मुळजी जेठा महाविद्यालय : एकांकिका प्रेमा तर उत्तेजनार्थ सांघिक पारितोषिक एन.टी.वि.एस. महाविद्यालय नंदुरबार : एकांकिका बेगर्स फॉर डॉक्टर, उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम : दिमाने पठार (मॅडम), द्वितीय सोनल पगारे (मुंग्या), उत्कृष्ट लेखन प्रथम रूपाली पाटील (मुंग्या), द्वितीय प्रज्ञा बिऱ्हाडे (प्रेमा), उत्कृष्ट नेपथ्य प्रथम हर्षल निकम (मॅडम), द्वितीय अभिषेक कासार (प्रेमा), उत्कृष्ट प्रकाश योजना प्रथम विशाल गाडीलोहार (मॅडम), द्वितीय उमेश चव्हाण (प्रेमा), उत्कृष्ट पार्श्वसंगीत प्रथम स्वप्निल ननवरे (मुंग्या), द्वितीय जयेश महाजन (मॅडम), उत्कृष्ट रंगभूषा स्वप्नील डोळसे (मुंग्या), द्वितीय रूपाली कोळी (बेगर्स फॉर डॉक्टर), उत्कृष्ट अभिनय पुरुष प्रथम दर्शन गुजराती (मुंग्या), द्वितीय कुणाल वीर (बेगर्स फॉर डॉक्टर), उत्कृष्ट अभिनय महिला प्रथम गौरी चौधरी (मॅडम), द्वितीय तेजसा सावळे (प्रेमा), अभिनय प्रमाणपत्र सिद्धांत सोनवणे, प्रज्ञा बिऱ्हाडे (प्रेमा), उमेश गोरदे, सोनल पगारे (मुंग्या), रचना अहिरराव, हितेशा हडप (मॅडम)

बातम्या आणखी आहेत...