आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील शाळा-महाविद्यालयांत नागपंचमी सण साजरा करण्यात आला. वैज्ञानिकदृष्ट्या विद्यार्थ्यांच्या मनातील सापांबाबत समज-गैरसमज दूर करण्यात आले. साप दिसताच त्यांना मारू नका. सर्पमित्रांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्या, असे जनजागृतीपर उपक्रमांतून करण्यात आले.
रायसोनी स्कूल : बी. यू.एन. रायसोनी मराठी स्कूलच्या शिशुविहार विभागात नागपंचमीनिमित्त मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील व मुख्याध्यापिका रेखा कोळंबे यांनी वारुळाची पूजा केली. प्रोजेक्टरद्वारे मार्गदर्शन करून सापांबाबत भीती दूर केली.
कमल वाणी बालनिकेतन विद्यालय : कमल वाणी बालनिकेतन विद्यालय व नवीन विद्यालयात नागपंचमिनिमित्ताने विद्यार्थ्यांच्या हस्ते वारुळाचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ज्योती सपकाळे व वंदना नेहेते यांनी केले.
ए. टी. झांबरे विद्यालयात सर्पमित्रांनी केले मार्गदर्शन
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, हरित सेना विभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे नागपंचमी सणाबाबत जनजागृती करण्यात आली. वन्यजीव संस्थेचे सर्पमित्र जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, हेमराज सपकाळे यांनी भारतात आढळून येणाऱ्या सर्पांच्या प्रजातींची ओळख पोस्टरद्वारे करून दिली. मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे व शिक्षक उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.