आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुने जळगावातील गोपाळपुऱ्यातील श्रीकृष्ण नगरातील २५हून अधिक घरांमध्ये मीटरची तपासणी करत या वीज ग्राहकांना मीटरमध्ये दोष दाखवून अवास्तव बिलांच्या रकमा पाठवल्या. तसेच महिला घरी एकट्या असताना अवैध मार्गाने बाथरुमपर्यंत जाणाऱ्या वीज पथकाचाही निषेध व्यक्त करत महिला नागरिकांनी शहरातील महावितरणच्या दीक्षितवाडीतील ग्रामीण व शहर कार्यालयात ठिय्या आंदोलन करत अभियंत्यांना जाब विचारला.
जुने जळगावातील गोपाळपुरा परिसरात २१ नोव्हेंबर रोजी महावितरणचे एका पथकाने अनेक घरात घुसून कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर काढून नेली. या पथकाने मीटरमध्ये दोष होता तर जागेवरच पंचनामा करणे गरजेचे होते; मात्र पथकाने हे वीज मीटर परस्पर काढून ३० तारखेला अवास्तव बिले पाठवली. तसेच ही बिले २ तारखेच्या आत भरली नाहीत तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.
महावितरणच्या या अवास्तव मागणीने हतबल होत या परिसरातील महिला-नागरिकांनी एकत्र येत महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पुरुष मंडळी नसताना घरांमध्ये बाथरूमपर्यंत तपासणी करणाऱ्या पथकाचाही या महिलांनी निषेध व्यक्त केला. हे अवास्तव बिल कमी केले नाही तर महावितरण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा देत या महिलांनी प्रभारी अभियंता विजय पाटील यांना निवेदन दिले. या वेळी ललित नारखेडे व सुरज नारखेडे यांच्यासह वीज ग्राहक महिला-पुरुष सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.