आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैराण:मनुदेवी सोसायटीतील नागरिक रस्ते, गटारींच्या समस्येने हैराण

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आहुजानगर परिसरातील मनुदेवी सोसायटीलगत रस्त्यांअभावी नागरिक हैराण झाले आहेत. परिसरात गटारी झाल्या असल्या तरी येथे चार भागांतून गटारी येऊन एका ठिकाणी मिळतात. त्या गटारीवरील ढापाही देखील अडचणीचा ठरत आहे. पावसाळ्यात या गटारीमधील पाणी रस्त्यावर साचणाऱ्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने यावर वेळीच उपाय करण्याची गरज आहे.

आहुजानगरातील मनुदेवी सोसाटीलगत कुठेही रस्ते नाहीत. तसेच काही भागात नुकतेच गटारींच्या कामाला सुरुवातही झाली आहे. त्यामुळे आता तरी खुल्या भूखंडावरील तुंबलेल्या पाण्यापासून आपली मुक्तता होईल अशी येथील नागरिकांची आशा होती; मात्र येथील मुख्य रस्त्यावरील ढाप्याखाली गटारीला येऊन मिळणाऱ्या इतर चार गटारींमुळे पावसाळ्यात पाण्याच्या लोंढ्याला अडथळा येऊन गटारीतील पाणी परिसरात पसरणार आहे. त्यामुळे गटारी होऊनही खुल्या भूखंडावर नेहमीप्रमाणेच पाणी तुंबण्याचा धोका आहे. तसेच या परिसरातून वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरांची जा-ये सुरू असते. असे असतानाही ढापा व्यवस्थित न टाकण्यामुळे जड वाहतुकीने ढापादेखील कोसळण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ढाप्याचे काम थातूरमातूर
मनुदेवी सोसायटीत गटारींचे काम सुरू आहे. मुख्य रस्त्यातील गटारीवर ढापा टाकण्यात आला आहे; मात्र येथून वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरांची जड वाहतूक नियमित सुरू असते. त्यामुळे हा ढापा पूर्णत: काँक्रिटीकरण व आसाऱ्यांच्या जाळ्यांमध्ये तयार होणे गरजेचे होते. मात्र, येथील काम थातूरमातूर झाले आहे.
- दीपक भामरे, मनुदेवी सोसायटी

अंधारात महिला पडतात
गटारीवरील हा ढापा गेल्या महिन्याभरापासून तयार होऊन तसाच पडून आहे. या ढाप्यालगत दोन्ही बाजूला एक-दीड फुटांचा खोलखंड्ड्यात मातीने भराव न केल्याने येथे रात्री महिला-पुरुष पडत आहेत. ठेकेदाराने कमीत-कमी दोन्ही कडील खड्डा तरी भरून पादचाऱ्यासाठी हा ढापा सुरू करण्याची गरज आहे.
- महेंद्र चौधरी, मनुदेवी सोसायटी

गटारी होऊनही पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती
मनुदेवी सोसायटीलगत खुला भूखंडात गटारी होण्याआधी कायम पाणी साचत असे; मात्र गटारी होऊनही पावसाळ्यात ह्या गटारींचे पाणी खुल्या भूखंडात पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण मुख्य रस्त्यावरील गटारीत इतर भागातील चार गटारी येथे येऊन मिळतात. पावसाळ्यात या गटारींचे पाणी या खुल्या भूखंडात निश्चित पसरेल.
- दिलीप कोल्हे, मनुदेवी सोसायटी

बातम्या आणखी आहेत...