आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाकडून हवी नुकसानभरपाई‎:घनकचरा प्रकल्पाच्या‎ वाढीव खर्चासाठी दावा‎

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार वर्षांपासून सुरू हाेण्याची‎ प्रतीक्षा असलेल्या घनकचरा प्रकल्पातील अडचणी‎ कमी हाेण्याएेवजी वाढत आहेत. काेराेना आणि युक्रेन‎ युद्धामुळे स्टील, सिमेंट आदींच्या दरात प्रचंड वाढ‎ झाली आहे. त्यामुळे जुन्या दरसूचीपेक्षा अधिक खर्च‎ हाेणार आहे. मनपाकडून वाढीव खर्च मिळत‎ नसल्याने मक्तेदाराने मनपाविरुद्ध १५ काेटींचा दावा‎ दाखल केला आहे.

त्यामुळे वाढीव खर्चाचे दाेन काेटी‎ अदा करावेत की न्यायालयीन लढा लढावा या दाेन‎ पर्यायांवर महासभेला निर्णय घ्यावा लागणार आहे.‎ आव्हाणे शिवारात घनकचरा प्रकल्पाचे काम मंजूर‎ आहे. यासाठी ३० काेटी ७५ लाख रुपयांच्या‎ अंदाजपत्रकात वाढ करून ४९ काेटी ६८ लाख‎ रुपयांच्या वाढीव अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली‎ असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येते आहे.‎

बातम्या आणखी आहेत...