आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ब्रेकिंग:आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करत शिंदेसेना महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढणार

जळगाव | दीपक पटवे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आमचीच शिवसेना खरी’ असा दावा करत बंडखाेर नेते एकनाथ शिंदे गुरुवारी सायंकाळपर्यंत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढतील. समर्थक ४५ आमदारांच्या स्वाक्षरीसह तसे पत्र शिंदे राज्यपालांना देतील. आपल्याच आमदारांकडून सरकार अस्थिर झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनाम्याचा मार्ग पत्करतील, अशी दाट शक्यता आहे. तसे झाले नाही तर राज्यपाल ठाकरेंना ४८ तासांत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतील.

भाजपच्या या ‘आॅपरेशन लाेटस’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असलेले आमदार गिरीश महाजन म्हणाले, शिंदे गटाकडे येण्यासाठी आता आमदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. शिवसेना व मित्रपक्षांचे अनेक आमदार त्यांच्यासाेबत आहेत. २/३ आमदारांचे पाठबळ असल्याने आम्हीच अधिकृत शिवसेना आहोत, असा शिंदे गटाचा दावा आहे. त्याच अनुषंगाने हे पत्र राज्यपालांना दिले जाईल.

उद्धव ठाकरे हवे की हिंदुत्व ? शिंदेंचे शिवसैनिकांना चॅलेंज
शिवसेनेचा स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवायची असेल तर शिंदेना २/३ संख्याबळ सिद्ध करावे लागेल. हा पेच टाळण्यासाठी आमचीच खरी शिवसेना, असा दावा करत ते पाठिंबा काढण्याचे पत्र राज्यपालांना देतील. हिंदुत्व हवे की ठाकरे ? असे चॅलेंज शिंदेंनी शिवसैनिकांसमाेर उभे केले. यात पक्षाने कारवाई केली तरी शिंदेंना जनतेतून माेठी सहानुभूती मिळेल.

आदित्य यांनी हटवले पर्यावरणमंत्रिपद
महाविकास आघाडी सरकार रोसळणार असल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट झाले. त्यामुळे मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगाेलग ट्विटर हँडलवरून ‘पर्यावरणमंत्री’ हा उल्लेख काढून टाकला. मात्र, काही वेळातच शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘आदित्य ट्वीटवर मंत्रिपदाचा कधीच उल्लेख करत नाहीत,’ असे स्पष्टीकरण दिले.

बातम्या आणखी आहेत...