आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणूक:विसर्जन मार्गावर दुसऱ्या दिवशी स्वच्छता

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणरायाचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून या मिरवणुका निघाल्या. मिरवणुकीनंतर शनिवारी केशव स्मृती सेवा संस्थेने रस्त्यांची स्वच्छता केली. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर कचरा झाला होता. शनिवारी सकाळी ७:३० वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते टॉवर चौक पर्यंतचा संपूर्ण भाग विवेकानंद प्रतिष्ठानमधील ४०० विद्यार्थी आणि समूहातील १५० च्यावर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यकर्त्यांनी स्वच्छ केला.

खाद्य पदार्थाचे रिकामे पाकिटे, पेपर ग्लास, डिश व कप, रद्दी कागद, प्लास्टिकच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पाऊच, फुलाच्या पाकळया आणि गुलाल आदी स्वच्छ करून तो वाहनात भरला. स्वच्छता करताना मास्क, हातात हॅन्डग्लोज घालून काळजी घेण्यात आली. तसेच स्वच्छतेनंतर हात सॅनिटाइज करण्याकडेही लक्ष देण्यात आले. गणेश विसर्जनानंतर लगेचच सकाळी लवकर झालेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे जळगावकरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...