आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातेवाईकच निघाला चोर:बनावट चावीच्या मदतीने केली घरफोडी, घरातून लाखोंचा ऐवज जप्त

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैतन्य नगरातील चित्रप्रभा अपार्टमेंटमधील एका घराला बनावट चावीच्या मदतीने उघडून सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असा 1 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका नातेवाईकानेचे ही चोरी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे.

कल्पना अनिल कुलकर्णी (वय 54) यांच्या घरी ही चोरी झाली आहे. त्यांच्या जावयाच्या मोठ्या भावाचा शालक मनोज प्रकाश कुलकर्णी याने चोरी केल्याचे उघड झाले आहे.

काय आहे घटना

कल्पना कुलकर्णी या घरात एकट्या राहतात. त्यांची मुलगी भावना आणि जावई विजय पाठक हे गणेश कॉलनीत राहतात. कल्पना कुळकर्णी ह्या 29 मे ते 6 जून दरम्यान, औरंगाबाद येथे बहिणीच्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. यावेळी अज्ञात व्यक्तीने घरात बनावट चावीच्या मदतीने घरात प्रवेश करून कपाटातील 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार आणि त्यांच्या पाकीटामधून 2 हजार रुपयांची रोकड असा एकुण 1 लाख 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

गुन्हा दाखल

20 जून रोजी सायंकाळी घरात साफसाफाई करत असतांना कपाटच्या आतील लॉकर वगैरे चेक केले असता त्यांना त्यांचा तीन तोळ्याचा सोन्याचा राणीहार आढळून आला नाही. याबाबत मुलगी आणि जावई यांना देखील विचारपुस केली असता त्यांना देखील याची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. कुळकर्णी यांनी सोमवारी 20 जून रोजी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज तडवी करीत आहे. अपार्टमेंटचे फुटेज तपासले असता मनोज कुलकर्णी हा घरी आल्याचे दिसून आले. या संशयावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...