आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान तापमानात वाढ‎:ढग, धुके : दृश्यमानता‎ सकाळी 50 मीटरपर्यंत‎

जळगाव‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रावर‎ घाेंगावणाऱ्या अवकाळी पावसाच्या‎ ढगांमुळे उन्हाची तीव्रता घटली‎ आहे. तापमान ३७ अंशांवरून‎ तब्बल ३३ अंशांपर्यंत खाली आले‎ आहे. साेमवारी सकाळी १०‎ वाजेपर्यंत ढगाळ वातावरण आणि‎ धुक्यामुळे दृश्यमानता अवघ्या ५००‎ मीटरपर्यंत कमी झालेली हाेती.‎ दुपारनंतरही जवळपास ७८ टक्के‎ आकाश ढगांनी व्यापले हाेते.‎

राज्यात ४ मार्चपासून अवकाळी‎ पावसाच्या ढगांनी आकाश व्यापले‎ आहे. मंगळवारी उत्तर महाराष्ट्र,‎ विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी‎ पावसासह गारपिटीचा अंदाज‎ वर्तवण्यात आला आहे. साेमवारी‎ सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात‎ तुरळक ठिकाणी अवकाळी‎ पावसाच्या सरी काेसळल्या. तीन‎ दिवसांत जळगाव शहरात मात्र‎ पावसाने हजेरी लावली नाही; परंतु‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ढगाळ वातावरणाचा परिणाम‎ आराेग्यावर झाला आहे. उन्हाची‎ तीव्रता काही प्रमाणात घटली .‎ किमान तापमान ३७.६ अंशांवरून‎ ३३ अंश सेल्सिअंशांवर आले आहे.‎

किमान तापमानात वाढ‎
ढगाळ वातावरणाने कमाल तापमान‎ ३३ अंशांपर्यंत कमी झाल्याने उन्हाची‎ तीव्रता कमी झाली. दुसरीकडे‎ रात्रीचे किमान तापमान १८.७ अंश‎ सेल्सिअसपर्यंत वाढले, त्यामुळे‎ रात्रीचा गारठा कमी हाेऊन उकाडा‎ वाढण्याची शक्यता वाढली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...