आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:सहकार विभागाचे अधिकारी थेट लाच न घेताही रेकॉर्डिंगमुळे जाळ्यात

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईच्या वेळेस पंच म्हणून राहिलेले जळगाव सहकार विभागाचे दोन अधिकारी थेट लाच न घेताही व्हॉइस रेकॉर्डिंग डिव्हाइसमधील रेकॉर्डिंगमुळे जाळ्यात अडकले. संशयित अधिकाऱ्यांनी सिंधी कॉलनीतील घराची नोंद करून ताबा पावती देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची मागणी केली होती. जळगाव तालुका सहकारी उपनिबंधक विजय सुरेशचंद्र गोसावी (५४, रा.आशाबाबानगर) व सहायक अधिकारी चेतन सुधाकर राणे (४८, रा.प्लॉट क्रमांक १४१, गणेश कॉलनी) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. चेतन राणे सहायक निबंधक सहकारी संस्था रावेर म्हणून कार्यरत असून प्रतिनियुक्तीवर जळगाव येथे आहेत. तक्रारीनंतर सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सापळाही लावला. दरम्यान, एसीबीच्या कारवाईतील बारकावे माहीत असल्याने संशयितांनी थेट लाच स्वीकारली नाही आणि कारवाई फसली. मात्र, तत्पूर्वी लाचेची मागणी तक्रारदाराकडे असलेल्या डिव्हाइसमध्ये रेकॉर्ड झाली होती. त्या पुराव्याच्या आधारे मंगळवारी दुपारी पथकाने दोघांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...