आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराचे रात्रीचे तापमान १० अंशापर्यंत आलेले असताना बुधवारी दिवसाच्या कमाल तापमानात सहा अंश सेल्सिअसने घसरण झाली. दिवसा दुपारी २ वाजता केवळ २४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नाेंदवले गेले. धुके, ढगांमुळे ९५ टक्के झाकाेळलेल्या आकाशात सूर्याचा इव्ही इंडेक्स अवघ्या तीनच्या पातळीवर हाेता. उत्तरेकडील गार वाऱ्यांचा वेग ताशी सात किमीने वाढून १६ किमीवर गेल्याने बुधवार जळगावकरांसाठी ‘काेल्ड डे’ ठरला.
बर्फवृष्टीने उत्तर दिशेकडून येणारे गार वारे राज्यातील थंडी वाढवत आहेत. तापमान घटत असताना बुधवारी गार वाऱ्यांचा वेग ताशी नऊ किमीवरून तब्बल १६ किमीपर्यंत पाेहचला हाेता. सकाळी ९ वाजेनंतर वाऱ्याचा वेग अधिक वाढला. धुके आणि ढगाळ वातावरणाने थंडी अधिक वाढली.
शाळांमध्ये स्वेटर सक्ती थंडी वाढल्यामुळे शहरातील सकाळ सत्रात भरणाऱ्या शाळांनी वदि्यार्थ्यांना स्वेटर सक्ती केली आहे. याबाबतचे पत्र आणि मेसेज पालकांना पाठवण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील बहुतांश शाळांमध्ये वदि्यार्थी स्वेटर, कानटाेपी घालून थंडीपासून बचाव करताना दिसले.
कमाल तापमान प्रथमच घसरले मंगळवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेले हाेते. बुधवारी त्यात अचानक सहा अंश सेल्सिअसने घट हाेवून पारा २४ अंश सेल्सिअवर आला हाेता. त्यामुळे अचानकपणे गारठा वाढवणारा बुधवार ‘काेल्ड डे’ ठरला. गेल्या वर्षी ३१ जानेवारी २०२२ राेजी जिल्ह्यात ‘काेल्ड-डे’ची स्थिती हाेती. यावर्षी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात अशी स्थिती निर्माण झाली आहे.
रविवारनंतर गारठा वाढणार :किमान तापमान बुधवारी १०.५ अंश तर कमाल तापमान २४ अंशावर हाेते. गुरूवारी देखील दिवसाचे कमाल तापमान २४ ते २५ अंशावर राहील. रविवारनंतर गारठा वाढणार.
दुपारी पेटल्या शेकाेट्या : ‘काेल्ड-डे’ मुळे शहरात दिवसभर थंडीचा गारठा जाणवत हाेता. त्यामुळे शहरात अनेक भागात चक्क दुपारी १२ वाजेपासून रस्त्यांवर शेकाेट्या पेटवलेल्या हाेत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.