आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त कार्यक्रम:विद्यापीठ परिसरात 10 किलो‎ प्लास्टिक कचऱ्याचे संकलन‎

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र‎ विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी‎ राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना‎ विभागाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ अंतर्गत एकता दौड‎ काढण्यात आली. स्वच्छ भारत अभियान व‎ प्लास्टिकमुक्ती अभियानांतर्गत १० किलो प्लास्टिक‎ संकलित करण्यात आले.‎ प्रशासकीय इमारतीत सरदार वल्लभभाई पटेल,‎ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस कुलगुरू प्रा.‎ व्ही. एल. माहेश्वरी यांनी पुष्पहार अर्पण केला.

राष्ट्रीय‎ एकता दिनाची शपथ जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील‎ पाटील यांनी दिली. राष्ट्रीय सेवा याेजना विभाग व‎ समाजकार्य विभागातील रासेयो यांच्या संयुक्त विद्यमाने‎ काढण्यात आलेल्या एकता दौडला कुलगुरू प्रा.‎ माहेश्वरी यांनी हिरवी झेंडी दाखवली. त्यात ६०‎ स्वयंसेवक सहभागी झाले. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी.‎ इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रासेयाेचे‎ संचालक डॉ. सचिन नांद्रे उपस्थित होते. स्वयंसेवकांनी‎ विद्यापीठ परिसरात हा उपक्रम राबवला.‎

बातम्या आणखी आहेत...