आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा निकाल:ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे निकालात महाविद्यालयांची ‘आघाडी’ तर ऑफलाइन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची ‘पिछाडी’

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. यंदादेखील जळगाव शहरातील अनेक महाविद्यालयांनी निकालात १०० टक्के बाजी मारली. विद्यार्थ्यांना बऱ्याच विषयांत १०० पैकी १०० गुणदेखील मिळाले. तसेच ९० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील समाधानकारक आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे महाविद्यालयांनी ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला तर परीक्षा ऑफलाइन झाली.ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे महाविद्यालयांनी निकालात ‘आघाडी’ तर ऑफलाइन परीक्षामुळे विद्यार्थी गुण, श्रेणी व टक्केवारीमध्ये ‘पिछाडी’वर राहिले.

{विवेकानंद प्रतिष्ठान महाविद्यालय विवेकानंद प्रतिष्ठान महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. महाविद्यालयात प्रथम स्नेहा चिमकर ९०.६७ टक्के, द्वितीय घनश्याम गोहिल ८९.६७ टक्के, तृतीय सुजल भंगाळे ८८.१७ टक्के व गौरव जाधव ८८.१७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. {रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला. यात विज्ञान शाखेत प्रथम राजनंदिनी पाटील ७८.६७ टक्के, द्वितीय सिद्धांत कोठारी ७८.३३ टक्के, तृतीय हर्ष छतवाणी ७८ टक्के. वाणिज्य शाखेत प्रथम वैष्णवी झंवर ९३.३३ टक्के, द्वितीय चारूल पाटील ९२.८३, तृतीय मोहक अग्रवाल ९०.६७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. {डॉ. शाहीन काझी गर्ल्स ज्यु. कॉलेज डॉ. शाहीन काझी गर्ल्स ज्युनिअर कॉलेजचा १०० टक्के निकाल लागला. महाविद्यालयात प्रथम शेख रोजमीन परवीन शेख इरफान ८३.३३ टक्के, द्वितीय शेख तसनीम अ. अहद ८३.१७ टक्के, तृतीय खान नाजिया अफरोज ७५.१७ टक्के प्राप्त केले. {काशीबाई कोल्हे विद्यालय काशीबाई कोल्हे विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम कविता महाजन ७७.५० टक्के, द्वितीय तेजल पाटील ७५.५०, मागासवर्गातून प्रथम निशा सोनवणे ७५.१७ टक्के, द्वितीय निखिल साबळे ७३.१७ टक्के गुण प्राप्त केले. कला शाखेचा निकाल ८८.४६ लागला. यात प्रथम प्रेमगीर गोसावी ७६.६७ टक्के, द्वित्तीय चंचल जाधव ७०.३३ टक्के व लीना कोळी ७०.३३ टक्के गुण प्राप्त केले.

नूतन मराठा विद्यालयाचा ९५ टक्के निकाल लागला. यात विज्ञान शाखेचा निकाल ९९.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९२.५० तर कला शाखेचा निकाल ८४.६३ टक्के लागला. विज्ञान शाखेत प्रथम जय पाटील, द्वितीय नेहा बागुल, तृतीय श्रीनिवास उगले, वाणिज्य शाखेत प्रथम कोमल पाटील, द्वितीय चंद्रकांत गुरव, तर तृ़तीय यश बारी, कला शाखेत प्रथम अदिती वाणी, द्वितीय तेजस पाटील, तृतीय हर्षल परदेशी, व्यवसाय अभ्यासक्रम विभागात इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी प्रथम पंकज न्हावी व रोहित ठाकूर, अकाउंटंट अॅण्ड ऑफिस मॅनेजमेंट प्रथम देवेश दालवाला, द्वितीय नंदिनी ढोले. लॉजिस्टिक अॅण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट प्रथम अर्चना राठोड, द्वितीय चेतन सोनवणे हे यशस्वी झाले. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कौतुक केले आहे.

बाहेती महाविद्यालयाचा ९३.२५ टक्के निकाल; यंदा विज्ञान शाखा आघाडीवर ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालयाचा ९३.२५ टक्के निकाल लागला आहे. यात कला शाखा ८२.५८, वाणिज्य शाखा ९७.९६, विज्ञान शाखा ९९.२१ टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखेतून प्रथम आयुष जैन ९३.३३ टक्के, द्वितीय दर्शना पगारिया ८९.१७ टक्के, तृतीय हर्षाली प्रजापती ८८.५० टक्के, कला शाखेतून प्रथम अंजली मोरे ७६.३३ टक्के, द्वितीय जयेश मोरे ७२.६७ टक्के, तृतीय जान्हवी पाटील ७० टक्के, विज्ञान शाखेतून प्रथम यजत बियाणी ८१.३३ टक्के, द्वितीय सोहम कुलकर्णी ७९.१७ टक्के, तृतीय नमन जैन ७८.३३ टक्के गुण प्राप्त केले.

आर. आर. विद्यालयाचा ९३.८७ टक्के निकाल; विज्ञान शाखेत राहुल प्रथम आर. आर. विद्यालयाचा यंदा ९३.८७ टक्के निकाल लागला. यात विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक राहुल पाटील ८०.५० टक्के, द्वितीय आकांक्षा आंबाडे ७८.६७ टक्के, तृतीय मानसी महाजन ७८.५० टक्के व खुशी निकुंभ ७८.५० टक्के, वाणिज्य विभागात प्रथम कपिल सपकाळे ७३ टक्के, द्वितीय कृष्णा वाणी ७१ टक्के, तृतीय रुबिया तडवी ७१.३३ टक्के, कला शाखेत प्रथम वैभव वाणी ७०.१७ टक्के, द्वितीय विशाल घुगे ६९.३३ टक्के, तृतीय ज्ञानेश्वर साळुंखे ६८.८३ टक्के गुण प्राप्त केले. यशस्वितांचा शिक्षकांनी गौरव केला आहे.

बातम्या आणखी आहेत...