आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे दाखल:एलसीबीचे काेम्बिंग आॅपरेशन; दाेघा हद्दपारांना शहरातून घेतले ताब्यात

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेलिस अधीक्षकांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हा शाखेचे दाेन विशेष पथक तयार करण्यात आले हाेते. त्यांनी गुरुवारी सकाळी शहरात काेम्बिंग आॅपरेशन राबवले. या आॅपरेशनमध्ये पाेलिस रेकाॅर्डवर हद्दपार असलेले दाेन गुन्हेगार आढळून आले. पाेलिस हेडकाॅन्स्टेबल विजयसिंग पाटील व हेडकाॅन्स्टेबल सूरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ५ ते ८ वाजेच्या दरम्यान दाेन स्वतंत्र पथक तयार करून हे काेम्बिंग आॅपरेशन शहरात राबवले गेले.

त्यात सुनील उर्फ लखन भगवान सारवान (वय ३४, रा. गुरुनानकनगर, जळगाव) त्याचप्रमाणे समाधान हरचंद भाेई (वय २८, रा. खंडेरावनगर, जळगाव) हे दाेन हद्दपार करण्यात आलेले आराेपी आढळून आले. त्यांच्याविरुद्ध अनुक्रमे शनिपेठ व रामानंदनगर पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या दाेघा सराईत गुन्हेगारांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...