आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:जळगावामध्ये व्यापाराच्या ट्रक परस्पर विकला; सात लाखांच्या फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केळी व्यापाऱ्याने एक ट्रक विक्रीचा व्यवहार केला असता त्याच्या दोन ट्रक विक्री झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात व्यापाऱ्याची 7 लाख रुपयात फसवणूक झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सावदा येथील देविदास सिताराम राठोड (वय 37) केळी खरेदी विक्रीचा व्यापार करतात. त्यांनी एमएच 19 झेड 6955 हा ट्रक त्यांनी ब्रिजेशकुमार प्रकाश यादव (रा. सावदा, ता. रावेर) याला 31 जानेवारी 2023 रोजी आरटीओ कार्यालयातील एजंट शहादत अली यासीन अली (रा. फैजपूर) यांच्या मदतीने मुळ कागदपत्रांची पूर्तता करून विक्री केला. दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी राठोड यांनी ट्रक विक्री केल्याबाबतचे स्टेटस ऑनलाइन चेक केले असता एमएच 19 झेड 6955 हा ट्रक ब्रिजेशकुमार यादव यांचे नावावर नसल्याचे दिसून आले, तर हा ट्रक अब्दुल रशीद अब्दुल अजीज (रा. मालेगाव) याच्या नावावर दिसून आला. त्याचप्रमाणे त्यांचा दुसरा ट्रक एमएच 19 झेड 7055 याचे स्टेटस चेक केले असता हा ट्रक ब्रिजेशकुमार यादव यांच्या नावावर दिसून आला. दरम्यान आपण एकच ट्रक विक्री केला असून दोन ट्रक वेगवेगळ्या नावावर दिसून आल्याने राठोड यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार बुधवारी राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ब्रिजेशकुमार यादव व आरटीओ एजंट शहादत अली यासीन अली या दोघांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील तपास करीत आहेत.