आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिनाभरापासून निर्माण झालेला आयुक्तपदाचा तिढा उद्या सुटणार आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) २० डिसेंबर राेजी अंतिम सुनावणी आहे. ९ डिसेंबरच्या कामकाजादरम्यान मॅटने शासनाने नियुक्ती केलेल्या देविदास पवार यांना दैनंदिन कामकाज करण्याची परवानगी दिली हाेती. तर बदली झालेल्या आयुक्त डाॅ. विद्या गायकवाड यांनी पवार यांच्या नियुक्तीला व त्यांनी स्वीकारलेल्या पदभाराला आव्हान दिले आहे. डाॅ. गायकवाड यांच्या बदलीचे कारण देखील शासनाला विचारण्यात आले आहे. तसेच आयुक्त पवार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याने त्यांना संधी देण्यात आलेली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.