आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प नियाेजन:आयुक्त पवारांनी हजर होताच केला फायलींचा निपटारा; बैठकही घेतली

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दाेन दिवसांपासून मनपाकडे फिरकूनही न पाहणारे नवनियुक्त आयुक्त देविदास पवार बुधवारी मात्र दिवसभर कार्यालयात उपस्थित हाेते. सुधारित व मूळ अर्थसंकल्पाच्या नियाेजनासाठी त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. फाइलींचा निपटारा करत अधिकाऱ्यांची रखडलेली कामेही मार्गी लावली.

आयुक्तपदावरून शासन व मॅटमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. डाॅ. विद्या गायकवाड यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे; परंतु स्थगितीचे आदेश प्राप्त हाेण्यापूर्वीच रुजू झालेले देविदास पवार हे अद्याप पदावर कायम आहेत. यासंदर्भात ९ राेजी मॅटमध्ये शासनाकडून बाजू मांडली जाणार आहे. गेल्या सात दिवसांत शुक्रवारी तासाभरासाठी मनपात आलेल्या डाॅ. विद्या गायकवाड या पुन्हा परतल्या नाहीत. तर विद्यमान आयुक्त पवार हे साेमवारी दुपारी मनपातून गेल्यानंतर बुधवारी सकाळीच परतले. दरम्यान, मनपाच्या अभियंत्यांसाेबत साइट व्हिजिटला हाेताे. कार्यालयीन कामकाजही सुरू आहे. आयुक्त पदासंदर्भात जाे आदेश येईल ताे मान्य असेल असेही आयुक्त पवार यांनी सांगितले.

राज्य शासनाकडून ९ राेजी भक्कम बाजू मांडली जाणार आयुक्त पवार यांची नियुक्ती शासनाने केली आहे. त्यामुळे जाेपर्यंत शासन निर्णय देत नाही ताेपर्यंत पवार हेच आयुक्त म्हणून कार्यरत राहणार आहेत. दरम्यान, शासनाकडूनही ९ राेजी भक्कम बाजू मांडली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आयुक्त पवार हे मनपाच्या दैनंदिन कामात गुंतल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. त्यांनी आगामी मूळ व सुधारित अर्थसंकल्पासंदर्भात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. तसेच अर्थ विभागाकडून आलेल्या धनादेशांवर स्वाक्षरी करून प्रशासकीय कामाला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...