आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिेकचे आयुक्त नक्की काेण? या विषयाचा निर्णय आणखी दहा दिवस लांबणीवर पडला आहे. डाॅ. विद्या गायकवाड, आयुक्त देवीदास पवार आणि शासनाच्यावतीने आपापली बाजू भक्कमपणे मांडण्याचा जाेरदार प्रयत्न झाला. शुक्रवारी अंतिम निर्णय हाेवू न शकल्याने आयुक्तपदी नक्की काेण राहणार हा निर्णय २० डिसेंबर राेजी हाेईल. मनपाचा कारभार चालवायचा असल्याने तुर्ततरी दैनंदिन कामकाज करण्यासाठी आयुक्त पवार यांना परवानगी दिलेली असली तरी त्यांना धाेरणात्मक निर्णय घेण्यावर बंधने आहेत.
मनपाच्या इतिहासात प्रथमच आयुक्त पदावरून तिढा निर्माण झाला आहे. राज्य शासनाने २९ नाेव्हेंबर राेजी डाॅ. विद्या गायकवाड यांची बदली करून त्यांच्या जागी देवीदास पवार यांची नियुक्ती केली. बदलीचा आदेश प्राप्त हाेताच ३० नाेव्हेंबर राेजी पवार यांनी आयुक्तपदाची सूत्रे ताब्यात घेत कामकाजाला सुरूवात केली. त्यामुळे डाॅ. गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेत बदललीला स्थगिती मिळवली हाेती. त्यानंतर महापालिकेचा खरा आयुक्त काेण? हा वाद सुरू झाला आहे. डाॅ. गायकवाड यांच्या याचिकेनंतर आयुक्त पवार यांनीही ‘मॅट’मध्ये अर्ज देवून आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यात शुक्रवारी सुनावणीदरम्यान राज्य शासनाने आपली बाजू देखील मुद्देसूदपणे मांडली आहे. दरम्यान, ‘मॅट’मध्ये झालेल्या कामकाजानंतर आदेश साेमवारी महापालिकेला प्राप्त हाेण्याची शक्यता आहे.
डाॅ. विद्या गायकवाड : बदलीला स्थगिती मिळाल्यानंतर डाॅ. गायकवाड यांच्यावतीने वकिलांनी शुक्रवारी आयुक्तपदाबाबत आजच निर्णय द्यावा अशी विनंती केली. बदललीला स्थगिती हाेती. बदलीचे आदेश झाले असले तरी चार्ज हस्तांतरणाची प्रक्रीया न करताच एकतर्फी सूत्रे हाती घेण्याच्या कार्यपद्धतीला हरकत घेतली. बदली झालेली व्यक्ती हजर नसेल तर शासनाची परवानगी घेणे गरजेचे असल्याचा मुद्दा मांडला आहे.
देविदास पवार : पवार यांनी दाेन दिवसांपूर्वी मॅटमध्ये दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी झाली. शासनाने नियुक्तीचे आदेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चार्ज घेतला. त्यानंतर मॅटमध्ये बदलीला स्थगिती मिळाली आहे. चार्ज घेण्यासंदर्भात फाेनवर संदेश पाठवून कळवले हाेते. डाॅ. विद्या गायकवाड यांनी देखिल संमती दर्शवल्याची बाजू मांडली. दरम्यान, देवीदास पवार हे शुक्रवारी प्रतिज्ञापत्र सादर करू शकले नाही. वेळ कमी पडल्याचे कारण त्यांनी दिले.
राज्य शासन : आयुक्तांच्या बदलीप्रकरणी मॅटमध्ये शासनाच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. सिव्हीक बाेर्डाच्या मान्यतेने बदली केल्याचा युक्तीवाद करण्यात आला. दरम्यान, डाॅ. गायकवाड यांना थेट कार्यमुक्त कसे केले तसेच त्यांना का हटवले? याचे उत्तर शासनाकडून देण्यास असमर्थता दर्शवण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.