आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Complaining Many Times, No One Paid Attention; Due To Lack Of Roads, Gutters And Street Lights In Waghanagar, The Residents Became Helpless|marathi News

वनवास काही दूर होईना:अनेक वेळा तक्रार करूनही कुणीही लक्ष देईना; वाघनगरात रस्ते, गटारी, पथदिवे नसल्याने रहिवासी झाले हतबल

जळगाव7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागत असली तरी अजून देखील शहरातील उपनगरांतील कॉलन्या, नगरे, वसाहती ह्या पायाभूत सुविधांच्या प्रतीक्षेतच आहेत. वाघनगर परिसरात असलेल्या कॉलन्यांमध्ये रस्ते, गटारी, पथदिवे, कचरा संकलनाची सुविधा नसल्याने रहिावाशांना अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. ओरड करूनही प्रश्न सुटत नसल्याने लोकभावना तीव्र आहेत.

वाघनगर परिसरात दरवर्षी नवनवीन कॉलन्यांची भर पडत आहे. या कॉलन्यांमध्ये योग्य रस्ते, गटारी, पथदिवे आदी मूलभूत सुविधांची वानवा तर आहेच; परंतु परिसरातील कचऱ्याचीदेखील समस्या लोकांना भेडसावत आहे. वाघनगर परिसरातील विशाल कॉलनी, समर्थ कॉलनी, नवजीवन कॉलनी, जिजाऊनगर परिसरात पक्के रस्ते नसल्याने लोकांना यातनामय प्रवास करावा लागतो आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर वाळू टाकलेली आहे. त्यामुळे वाहने घसरून अनेकांवर जायबंदी होण्याची वेळ आली आहे. या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी करुन देखील कुणीही लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

रस्त्यांची प्रमुख समस्या सोडवा
वाघनगर परिसरातील अनेक नवीन कॉलन्यांमध्ये रस्ते, गटारींचा अभाव आहे. अनेक कॉलन्यात उंच-सखल, खडकाळ भागात असल्याने रस्त्यांवर दगड-गोटे पसले आहेत. पालिका-सावखेडा असा वाद असल्याने अनेक भागातील नागरिकच खड्डे दुरुस्ती करतात. - रवी बोरसे, वाघनगर

गटारीच्या समस्यामुळे अडचणी
नवीनच काय जुन्या कॉलन्यांतही रस्ते, गटारींची समस्या कायम आहे. अनेक भागांत मूलभूत सुविधांची वानवा आहे. अनेक भाग हद्दीच्या वादात अडकला आहे. आम्हाला हद्दीशी देणे-घेणे नाही. कामे होणे महत्त्वाचे आहे. मूलभूत सेवासुविधा मिळाल्या पाहिजेत. - मीराबाई नन्वरे, वाघनगर

नगरसेवकांबाबत व्यक्त केली जातेय नाराजी
विशाल कॉलनी, समर्थ कॉलनी, नवजीवन कॉलनी, जिजाऊ नगर परिसरातील अनेकांना आपल्या प्रभागात नगरसेवक कोण हेदेखील माहीत नाही. तर काहींनी नगरसेवक कोण हे सांगण्यास टाळाटाळ केली. नगरसेवकांकडे तक्रार घेऊन गेल्यावरच नगरसेवकांना समस्या समजतील का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करताहेत.

वाघनगरातील रस्त्याची बिकट असलेली स्थिती.
पालिकेने मूलभूत सुविधा द्याव्या
जागृती हौसिंग सोसायटी, श्रीधरनगर, जयभोले चौक, श्री किसनरावनगर, विवेकानंदनगर, जिजाऊनगर परिसरात रस्ते, गटारी, वीज, काटेरी झुडपे, अस्वच्छता, गटारी तुंबणे, कचरा आदी समस्यांनी नागरिक त्रस्त आहे. या मूलभूत सुविधा तरी आम्हाला मिळाव्या. - विजय सोनार, वाघनगर

बातम्या आणखी आहेत...