आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:माध्यमिक पतपेढीच्या जागा खरेदीत अपहाराची तक्रार; मंगळवारी चाैकशी

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नाेकर पतपेढी या संस्थेत इमारत जागा खरेदी, बांधकाम, फर्निचर, इमारत दुरुस्तीत अपहार झाल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.या तक्रारीवर जिल्हा उपनिबंधकांकडून येत्या २२ नाेव्हेंबर राेजी चाैकशीसाठी सुनावणी घेण्यात येणार आहे.

तर जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात देखील तक्रारीबाबत माहिती घेतली जाते आहे. माध्यमिक शिक्षक पतपेढीत जागा खरेदी प्रकरणात २ काेटी २४ लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार पतपेढीचे सदस्य विनाेद महेश्री यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली तक्रार पाेलिस अधीक्षकांमार्फत जिल्हापेठ पाेलिसांत पाेहाेचली असून गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधितांचे जबाब घेतले जात आहेत.

तर या तक्रारीसह संचालक मंडळाची मुदत संपल्याने त्यांना धाेरणात्मक निर्णय मज्जाव करावा अशी मागणी करणारे पत्र जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. उपनिबंधकांनी या तक्रारींसह विनाेद महेश्रींच्या एकत्रित चाैकशीसाठी तक्रारदार व पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांना २२ राेजी सुनावणीला उपस्थित राहण्याबाबत पत्र दिले आहे.

आराेप राजकीय अन‌् चुकीचे : जागा खरेदीचा व्यवहार धनादेशाद्वारे केला आहे. सुनावणी ही संचालक मंडळाला धाेरणात्मक निर्णय घेण्यास मज्जाव करावा या मागणीवर आहे. निवडणुकीच्या ताेंडावर हे आराेप हाेत आहेत त्यात तथ्य नाही.-शालिग्राम भिरूड, चेअरमन, माध्यामिक शिक्षक पतपेढी

बातम्या आणखी आहेत...