आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Complaint Of Embezzlement In Purchase Of Secondary Credit Bank Seats; Hearing On Applications Tomorrow With Substantive Decisions| Marathi News

सुनावणी:माध्यमिक पतपेढीच्या जागा खरेदीमध्ये अपहाराची तक्रार; धाेरणात्मक निर्णयांसह अर्जांवर उद्या सुनावणी

जळगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर नाेकर पतपेढी या संस्थेत इमारत जागा खरेदी, बांधकाम, फर्निचर, इमारत दुरूस्तीत अपहार झाल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या तक्रारीवर जिल्हा उपनिबंधकांकडून येत्या २२ नाेव्हेंबर राेजी चाैकशीसाठी सुनावणी घेण्यात येणार आहे. तर जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात देखील तक्रारीबाबत माहिती घेतली जाते आहे.

माध्यमिक शिक्षक पतपेढीत जागा खरेदी प्रकरणात २ काेटी २४ लाख रूपयांचा अपहार झाल्याची तक्रार पतपेढीचे सदस्य विनाेद महेश्री यांनी केली आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पाेलिसांकडून संबंधितांचे जाबजबाब घेतले जात आहेत.

तर या तक्रारीसह संचालक मंडळाची मुदत संपलेली असल्याने त्यांना धाेरणात्मक निर्णय मज्जाव करावा अशी मागणी करणारे पत्र जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहे. जागा खरेदीचा व्यवहार धनादेशाद्वारे केला आहे. सुनावणी ही संचालक मंडळाला धाेरणात्मक निर्णय घेण्यास मज्जाव करावा या मागणीवर आहे. आराेपात तथ्य नाही, असे पतपेढीचे चेअरमन शालिग्राम भिरूड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...