आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीई प्रवेश:संकेतस्थळ‎ हँग‎ हाेत असल्याची ओरड‎, 17 मार्चपर्यंत मुदत; 3122 जागांसाठी 6869 अर्ज‎

जळगाव‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण हक्क अर्थात आरटीईच्या‎‎ प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी सुरू‎ असताना‎ त्यात मोठ्या प्रमाणावर‎ अडचणींचा सामना‎ करावा लागताे‎ आहे. काही दिवसांपासून‎ संकेतस्थळ‎ चालत नसल्याने कोणाशी संपर्क‎‎ साधायचा याची माहिती‎ देण्यात‎ आलेली नसल्याने पालकांची कोंडी‎ झाली आहे. याचा‎ गैरफायदा सायबर‎ कॅफेचालकांकडून घेतला‎ जात‎ असल्याचे चित्र अाहे.‎ शिक्षण हक्क‎ कायद्यांतर्गत‎ (आरटीई) राज्यातील दुर्बल‎ व वंचित‎ घटकांमधील मुलांना खासगी‎‎ शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५‎ टक्के‎ जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात‎ येणाऱ्या‎ आरटीई प्रवेश प्रक्रियेला‎ सुरुवात करण्यात‎ आली आहे.

त्यामुळे‎ पालकांना मुलांच्या‎ प्रवेशासाठी १७‎ मार्चपर्यंत‎ ऑनलाइन पद्धतीने अर्ज‎ सादर करता येणार‎ आहे.‎ आरटीई‎ प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे‎ पालकांचे लक्ष लागले होते.‎ प्रवेश‎ प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या‎‎ आठवड्यात सुरू होणार होती.‎ याबाबत सूचना प्राप्त झाल्यानंतर,‎‎ आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त लाभला‎ आहे.‎ प्रवेश प्रक्रियेत शाळांची नोंदणी‎ पूर्ण झाली‎ असून, पालकांना १७‎‎ मार्चदरम्यान अर्ज करता येणार आहेत.‎‎ जिल्ह्यात २८२ शाळांनी आरटीईसाठी‎ नोंदणी‎ केलेली असून, ३१२२ जागा‎ उपलब्ध आहेत.‎ अर्ज करण्यासाठी १७‎ मार्च शेवटची तारीख‎ असली तरी‎ आतापर्यंत ६८६९ अर्थात दुपटीने अर्ज‎ सादर झाले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...