आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हँग, बॅटरी चार्जिंग, की-पॅड टच न होण्याच्या तक्रारी वाढल्या; विभागात एसटीचे 50% ‘ईटीआयएम’ बंद; वाहकांच्या हाती पुन्हा तिकीट ट्रे

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिवहन मंडळाच्या जळगाव विभागात १,८५२ इलेक्ट्रॉनिक्स तिकीट इश्यू मशीन (ईटीआयएम) आहेत. मात्र, बॅटरी चार्जिंग व की-पॅड टच न होणे, वारंवार हँग होऊन काम न करणे या कारणांनी ९७५ अर्थात ५० टक्के ईटीआयएम बंद आहेत. म्हणून वाहकांच्या हातात पुन्हा तिकिट ट्रे देण्याची वेळ आली.

विभागातील प्रत्येक वाहकाला तिकीट ट्रेसह चार्जिंग केलेले ईटीआयएम मशीन दिले आहे. ड्युटीच्या वेळेत वाहकाला अडचण येत नाही. ड्युटी संपल्यानंतर कॅशियरकडे पैशांसह दिवसभराचा लेखाजोखा सुपूर्द केला जातो. दुसऱ्या दिवशी नवीन चार्जिंगसह हे मशीन उपलब्ध करून दिले जाते.

सध्या ५० टक्के मशीन नादुरुस्त आहेत. या मशीनवर एका बटनावर रिपोर्ट मिळतो. मात्र, रस्त्यात हे मशीन बंद पडल्यास वाहकांना पुन्हा तिकीट ट्रेचा वापर करावा लागतो. त्यात वाहकांना दिवसभरात किती तिकिटे गेली. त्याचे पैसे किती आले ही माहीती सध्या एका सीटमध्ये वाहकांना भरून द्यावी लागते आहे.

बातम्या आणखी आहेत...