आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमआयडीसीतील व्यावसायीक ग्राहकांना महावितरणकडून वीजबिल भरणा करण्याच्या दिवशीच दुपारी बिले मिळाली. ऐनवेळी मिळालेल्या बिलांमुळे उद्योजकांची गैरसोय झाली.
महावितरणकडून ग्राहकांना महिन्याचे वीजबिल भरण्यासाठी बिल मिळाल्यानंतर किमान १५ दिवसांचा वेळ मिळतो. महावितरणकडून वीजबिल वितरणाचे काम दिलेल्या एजन्सीने वेळेत बिल न दिल्यास ग्राहकांना त्याचा आर्थिक फटका बसतो. मे महिन्यातील वीजबिल भरण्यासाठी एमआयडीसीतील ग्राहकांना १४ जून ही अंतीम तारीख दिलेली होती. याच तारखेला ग्राहकांना दुपारनंतर बिले मिळाली. एमआयडीसीत असलेल्या शेकडो उद्योजकांची महिन्याची एकत्रित बिले कोटींच्या घरात असतात. वैयक्तिक लाख रूपयांमध्ये वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. अशा स्थितीत वेळेत बिल न मिळाल्यास ग्राहक वेळेत भरणा करू शकत नाहीत. वीज थकबाकी झाल्यास त्यावर ग्राहकांना दंड भरावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. त्यामुळे उशिराने आलेल्या बिलांबाबत ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहेत.
भरणा करण्याच्या दिवशीच मिळाले वीजबिल
ज्या दिवशी वीजबिल भरायाची अंतिम मुदत आहे, त्याच दिवशी बिल मिळाले. त्यामुळे ऐनवेळी बिलाचा भरणा कसा करायचा? याबाबत महावितरणकडे वेळेत बिल मिळावे ही मागणी केली आहे. विनाकारण भूर्दंड बसतो. पंकज बऱ्हाटे, उद्योजक एमायडीसी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.