आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेतील रुटीन इव्हेंट:नगरसेवकांच्या पुन्हा निवडून येण्याच्या चिंतेने महासभेत गोंधळ; निष्पन्न शून्य

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील खराब रस्ते, संथगतीने सुरू असलेली विकास कामे अन् पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त जळगावकरांच्या हाती शुक्रवारच्या महासभेत अक्षरश: भाेपळा आला. पाच तासांच्या सभेत नगरसेवकांकडून झालेली आगपाखड अन् अधिकाऱ्यांच्या पारंपारीक उत्तरांशिवाय दुसरे काहीही हाती न आल्याने घाेर निराशा झाली आहे. त्यामुळे महापालिकेची महासभा म्हणजे दर महिन्याचा इव्हेंटच पार पडला.

महापालिकेची महासभा शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजता महापाैर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेचे कामकाज आयुक्त डाॅ. विद्या गायकवाड, उपमहापाैर कुलभूषण पाटील व नगरसचिव सुनील गाेराणे यांच्या उपस्थितीत झाले. सभेच्या सुरूवातीला नगरसेवक नितीन बरडे आणि अनंत जाेशी यांनी विषयांना सुरूवात हाेण्यापूर्वी त्यांच्या प्रभागातील साडे सात काेटींच्या कामांना हाेणाऱ्या विलंबावरून प्रशासनाला घेरले. या दाेन्ही नगरसेवकांच्या सुरात सुर मिसळत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अक्षरश: अधिकाऱ्यांवर आराेपांच्या फैरी सुरू केल्या. सुमारे दीड तासांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने जुन्याच आवेशात उत्तरे देत नगरसेवकांच्या प्रश्नांची बाेळवण केली.

अधिकाऱ्यांची खाली मान अन् ताेंडावर बाेट
भाजप, शिवसेनेसाेबत बंडखाेर गटाच्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील समस्यांचा पाढा वाचायला सुरूवात केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची जणू हजेरी सुरू झाली. भरपूर जुन्या आणि काही नव्या समस्यांवर बाजू मांडताना बांधकामच्या अभियंत्यांनी पाणीपुरवठा विभागाकडे तर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमृतच्या ठेकेदाराकडे चेंडू टाेलवत सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. ज्या प्रश्नांना उत्तर देणे अवघड हाेईल त्यावर खाली मान घालत ताेंडावर बाेट ठेवत बाेटचेपी भूमिका स्विकारल्याचे चित्र महासभेत हाेते.

निवडणूक दृष्टीक्षेपात ठेवून आगपाखड
प्रभागांमधील कामांचे कार्यादेश दिल्यानंतरही कामांना सुरूवात केली जात नसल्याने सत्ताधारी शिवसेना व बंडखाेर नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. रस्त्यांच्या कामासाठी एनओसी दिल्यानंतरही खाेदकाम केले जाते. मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे हा गाेंधळ सुरू असल्याचा आराेप केला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नगरसेवकांना नागरिकांचे बरे वाईट एेकावे लागत आहे. लाेकप्रतिनिधी असतानाही घृणास्पद वागणूक मिळते ती केवळ महापालिकेच्या प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे असे टिकास्त्र साेडले.

बातम्या आणखी आहेत...