आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिकेने सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे शासकीय कार्यालयांनाही अभय याेजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मनपाने सर्वच थकबाकीदार कार्यालयांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे भविष्यात करात सूट मिळत असतानाही लाभ न घेणाऱ्या शासकीय कार्यालयांना आॅडिटमध्ये जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. साडेचार काेटींची थकबाकी असून, त्यातून ३० टक्के रकमेची बचत हाेणार आहे.
आठवडाभरात शासकीय कार्यालयांनी भरणा न केल्यास सर्वसामान्य करदात्यांप्रमाणे कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. महानगरपालिकेने अभय शास्ती माफी योजना ५ फेब्रुवारीपासून सुरू केली असून, १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. १० मार्चपर्यंत मालमत्ता कराची एकूण थकबाकी ८३ कोटी रुपये वसूल झाली आहे. तर मागील तीन दिवसांत मालमत्ता कराची थकबाकी मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन एकूण साडेतीन कोटी रुपयांचा भरणा महापालिकेकडे करण्यात आलेला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.