आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारावेरात वाहन ओढून महागाईचा निषेध
वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा काँग्रेसतर्फे चारचाकी वाहन ओढूत रॅली काढून निषेध करण्यात आला. या रॅलीचे नेतृत्व आमदार शिरीष चौधरी यांनी केले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव दररोज वाढत आहेत. पेट्रोल डिझेलच्या भावाने शंभरी पार केली आहे. सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला केंद्र सरकारकडे वेळ नाही. त्यामुळे जनतेच्या मनात मोदी सरकार विरोधात संतप्त भावना निर्माण झाली आहे. काँग्रेस सर्व सामान्यांच्या पाठिशी ताकदीने उभी असून केंद्र सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसने देशभरात महागाईमुक्त भारत आंदोलन उभे केले आहे. येथील काँग्रेस भावनापासून या रॅलीला आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सुरूवात झाली.
डिझेल दरवाढ निषेधार्थ चारचाकी वाहन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयापर्यंत ओढत नेले. तसेच पेट्रोल व गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी दुचाकी व गॅसची हंडी हातगाडीवर ठेवून रॅली काढली. या रॅलीत तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, शहराध्यक्ष संतोष पाटील, राजू सवरणे, सावन मेढे, अॅड.योगेश गजरे, धुमा तायडे, मानसी पवार, भाग्यश्री पाठक, आर.एस.लहासे, विनायक महाजन, एस.आर.चौधरी, मिलिंद पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मागणीचे निवेदन देण्यात आले.
चोपड्यात गॅस सिलिंडरसह धरणे आंदोलन
चोपडा | सध्या देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. इंधनाच्या किमती रोज वाढत असल्याचे चित्र असल्याने वाढत्या महागाईच्या मुद्यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या महागाई तसेच इंधन दरवाढ विरोधात चोपडा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयावर महागाई मुक्त भारतासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले.
सन २०१४ पासून केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले असून या सरकारचे नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. परंतु गेल्या ८ वर्षांपासून देशात सतत महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. या कालावधीत देशात वाढलेली बेरोजगारी कमी न करता सतत महागाई वाढवून सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात आहे. सद्यस्थितीत इंधनाचे दर तर सतत वाढून गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत असून त्या सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहेत. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, गॅससिलिंडर, सिमेंट व लोखंड यांच्या भावात गेल्या चारच महिन्यात दुपटीने वाढ झाल्याचे चित्र आहे. परंतु या गोष्टीकडे केंद्र सरकार सतत डोळेझाक करत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
या निवेदनावर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, शहराध्यक्ष के.डी. चौधरी, राजेंद्र पाटील, शशिकांत साळुंखे, प्रमोद पाटील, बी.एम. पाटील, मधुकर बाविस्कर, नंदकिशोर सांगोरे, अॅड.एस.डी. पाटील, देविदास सोनवणे, किरण सोनवणे, चेतन बाविस्कर आदींच्या स्वाक्षऱ्या असून निवेदन देतेवेळी हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.