आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील शेवटचा दिवस:डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करणार, काँग्रेसचा निर्धार

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील शेवटचा दिवस आहे. 14 दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात प्रवेश करत राहुल गांधींची ही यात्रा महाराष्ट्रात धडकली होती.

आज जळगाव जामोद येथे पहाटे सहा वाजताच राहुल गांधींच्या यात्रेला सुरूवात झाली. जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. काल रात्रीचा भेंडवळ या गावी यात्रेचा मुक्काम होता केला. त्याआधी राहुल गांधी यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण केली.

आज भारत जोडो यात्रेत पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुरड्या.
आज भारत जोडो यात्रेत पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुरड्या.

काँग्रेसचा निर्धार

आज यात्रेला सुरूवात करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार काँग्रेसने केला.

भारत जोडो यात्रेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजीव गांधी यांच्या प्रतिमेसह सहभागी झालेले नागरिक.
भारत जोडो यात्रेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजीव गांधी यांच्या प्रतिमेसह सहभागी झालेले नागरिक.

आजची यात्रा अशी असेल

  • सकाळी 6 वाजता - भेंडवळ येथून पदयात्रा सुरू
  • सकाळी 10 वाजता - जळगाव जामोद येथील सातपुडा एज्युकेशन सोसायटी परिसरात थांबणार
  • दुपारी साडेतीन वाजता - पदयात्रेला संविधान चौक, जळगाव जामोद, जि. बुलढाणा येथून सुरूवात
  • सायंकाळी 7 वाजता - पदयात्रा निमखेडी पोलीस चौकीजवळ, जळगाव जामोद येथे थांबणार
  • रात्रीचा मुक्काम बुऱ्हाणपूर येथे.
यात्रेत तरुणाने राहुल गांधींना दिलेली भेट
यात्रेत तरुणाने राहुल गांधींना दिलेली भेट

733 बळी टाळता आले असते

राहुल गांधी यांनी शनिवारी भेंडवळ येथे शहीद शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी राहुल गांधी म्हणाले, आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व शेतीला उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे मोदी सरकारने आणले होते. या जुलमी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांनी आवाज बुलंद करत दिल्लीला घेराव घालून ऐतिहासिक आंदोलन केले. मोदी सरकारला अखेर शेतकऱ्यांच्या आवाजासमोर झुकावे लागले व तीन काळे कायदे रद्द करावे लागले, या घटनेला आज एक वर्ष झाले. मात्र,सरकारच्या हटवादीपणामुळे 733 शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकरी चारीबाजूंनी नाडवला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर 733 बळी टाळता आले असते.

बातम्या आणखी आहेत...