आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार:आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या उपस्थितीत शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसची ट्रॅक्टर रॅलीद्वारे निदर्शने

नंदुरबार9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नंदुरबार शहरातून पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढून निदर्शने केली. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजप हटाव शेतकरी बचाव च घोषणा देण्यात आल्या.

केंद्रातील भाजप सरकार हे इंग्रजांनाही लाजवेल असे सरकार आहे. गरीब, दलित, आदिवासी, कामगार, शेतकरी यांना नेस्तनाबूत करण्यासाठी आणलेले काळे कायदे केंद्र सरकार जोपर्यंत रद्द करत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाचे आंदोलन सुरू राहणार असल्याचा नारा आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी दिला. या ट्रॅक्टर रॅलीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच जिल्ह्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार शिरीष कुमार नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...