आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन चुकले:राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी निवाऱ्याची उभारणी गैरसोयीच्या जागी, बसेस थांबत नसल्याने मनस्ताप ; प्रवासी उभे राहतात उन्हात, प्राधिकारण-महामंडळाचे दुर्लक्ष

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात प्राधिकरणाने नाहाटा चौफुलीवरील बस थांबा गैरसोयीच्या जागी उभारला आहे. यामुळे दोन्ही बाजूकडील बसथांब्यावर एकही बसही थांबत नाही. प्रवासी देखील त्याचा वापर करत नाहीत. पूर्वीच्या ठिकाणीच बस थांबतात. मात्र, तेथे शेड नसल्याने प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागते. महामार्ग प्राधिकरणाने शहरातून गेलेल्या महामार्गाचे चौपदरीकरण केले. तत्पूर्वी शहरातून जळगाव-कडे जाणाऱ्या एसटी बसेस नाहाटा चौफुलीजवळील शहर वाहतूक शाखेच्या चौकीजवळ थांबत होत्या. तर जळगाव-कडून येणाऱ्या बसेस दीनदयाळनगर जवळ थांबत होत्या. त्यामुळे चौपदरीकरणात या दोन्ही बसथांब्यांचे शेड उभारणी गरजेची होती. त्याऐवजी प्राधिकरणाने प्रवासी निवारा साधारण पाऊण ते एक किलोमीटर दूर अंतरावर हॉटेल स्वराज जवळ उभारला. भविष्यात या थांब्यांचा वापर लांब पल्ल्याच्या बसेससाठी टचिंग पॉइंट प्रमाणे करता येईल. मात्र, सर्व्हिस रोडवरही नवीन प्रवासी निवाऱ्याची नितांत गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...