आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आली थंडी, भरली हुडहुडी!:पारंपरिक स्वेटरपेक्षा मखमल वूल प्रकाराला ग्राहकांची पसंती; यंदा 10 टक्क्यांनी वूलन बाजार महागला

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परतीच्या पावसानंतर हवेत गारवा जाणवू लागला आहे. अशातच शहरात थंडी वाढल्याने गावात गरम कपड्यांची दुकानेही लावण्यात आली आहे. यंदा गरम कपड्यांमध्ये पारंपरिकसह असंख्य नवीन प्रकार बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे. यात बुलबूल, फैदर, मखमल वूल या नवीन प्रकारांना खरेदीरांकडून पसंती मिळत असून यंदा 10 टक्के वूलन बाजार महागल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

मखमल वूल प्रकाराला अधिक पसंती

तिबेटियन व महाराष्ट्रीयन विक्रेत्यांनी गरम कपड्यांची दुकाने थाटली आहेत. यात स्वेटरमध्ये 150 ते 900 रुपयांपर्यंत स्वेटर विक्रीला उपलब्ध आहेत. तसेच जॅकेट व इतर काही वेगळ्या प्रकारच्या गरम कपड्यांच्या किमती 2 ते 3 हजार दरम्यानही पहायला मिळतात. यंदा बाजारात जॅकेट, स्वेटर्स, बिन बाह्यांचे स्वेटर्स, महिलांसाठी लोकरी कोट, लहान मुलांसाठीचे जॅकेट्स आदी प्रकारचे गरम कपडे उपलब्ध आहेत; मात्र यात बुलबूल वूल, फैदर वूल, मखमल वूल या प्रकाराला अधिक पसंती दिली जात असल्याचे तिबेटियन विक्रेत्या सिरिन युडून यांनी सांगितले. तसेच मफलर, टोप्या, कानटोप्या, कान पट्ट्याही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

या कपड्यांना वाढती मागणी

मोठ्या व्यक्तींसाठी असलेल्या ‘टु इन वन’ जॅकेटच्या किंमती 600 ते 1 हजार रुपयांपर्यंत असून, महिलांचे कोट 500 ते 600 रुपयांपर्यंत तर लोकरी स्वेटर्स 250 ते 900 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. लहान मुलांचे जॅकेट्स आणि स्वेटर्सही 250 ते 900 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी माकड टोपी आणि कान टोपीला लोकांची जास्त पसंती मिळत आहे. तर महिलाही स्वेटर्सबरोबर स्कार्फचीही मागणी यंदा वाढली असल्याचे उबदार कपडे व्यावसायिक युडून यांनी सांगितले.

35 च्या वर उबदार कपड्यांची दुकाने

शिवतीर्थ मैदानावर दरवर्षी 35 च्या वर महाराष्ट्रीयन व तिबेटीयनींची दुकाने थाटली जातात. यंदा मात्र, तिबेटीयन व्यावसायिकांनी दुकाने थाटण्यात आघाडी घेतली आहे. तर महाराष्ट्रीयन दुकानदारा अजूनही दुकान थाटण्यात गर्क असल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...