आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोपाळपुऱ्याती श्रीकृष्णनगरात शुक्रवारी कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंता उमाकांत पाटील यांच्या पथकाला वीज ग्राहकांच्या संतापाचा सामना करावा लागला. यात आधी लोंबकळणाऱ्या तारा ओढा, उघडा फ्यूज बॉक्स बंद करा, आकाेडे बंद करा, मगच कारवाई करा. तसेच केवळ १५० रुपये रोज कमावणाऱ्या वीज ग्राहकाला अव्वाच्या सव्वा आलेले वीज बिल कमी करा या मागणीसाठी परिसरातील ४०० वर नागरिकांनी वीज पथकाला घेराव घातला.
श्रीकृष्णनगरातील नागरिकांनी अव्वाच्या सव्वा आलेले वीज बिल कमी करा या मागणीसाठी २ रोजी दीक्षितवाडीतील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करुन निवेदन दिले होते. असे असताना शुक्रवारी महावितरण पथकाकडून परिसरातील वीज खंडित करण्यासाठी १० ते १५ जणांचे पथक आले होते. पथकाला ललित नारखेडे, आंतराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सूरज नारखेडे यांच्या नेतृत्वात घेराव घालण्यात आला. महावितरणच्या जादा बील व कारवाईबाबत मानवाधिकार परिषदेतर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. तसेच याबाबत न्यायालयात व ग्राहकमंचात दाद मागण्यात येईल, असे नारखेडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.