आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चातुर्मास:जीवनात समाधान महत्त्वाचे ; प्रवचनात जयपुरंदरमुनी यांचा माेलाचा सल्ला

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याकडे जे आहे त्यात संतोष किंवा समाधानी असणे अत्यंत आवश्यक आहे. जे आहे त्यात समाधान नाही; परंतु जे आपल्याकडे नाही त्याचे दुःख करत बसण्याचा मनुष्य स्वभाव आहे. मनुष्याने आपल्या मनात संतोष ठेवावा अर्थात प्रत्येकाने ‘संतोषामृत पिया करूँ’ ही मेरी भावना रचनेची ओळ लक्षात ठेवावी, असे विचार डॉ. पदमचंद्र मुनी यांचे शिष्य जयपुरंदरमुनी यांनी ‘मेरी भावना’ या प्रवचन मालिकेत व्यक्त केले.

समाधानाच्या बाबत जगात चार प्रकारचे लोक असतात. ज्यांच्याकडे संपत्ती आहे पण संतोष नाही, ज्यांच्याकडे संपत्ती नाही पण संतोष आहे, ज्यांच्याकडे संतोष पण नाही आणि समाधान पण नाही असे आणि चौथ्या प्रकारातील पुण्यवान ज्यांच्याकडे संपत्तीही असते आणि संतोष देखील असतो. जीवनात संतोषरूपी अमृत प्यायल्याने आपला आत्मा आनंदी राहू शकतो. सकारात्मक विचार करण्याला प्राधान्य द्या. संपत्तीचा माेह बाळगू नका. विचारांची दिशा स्पष्ट ठेवून काम करा. जास्त विचार करू नका, असे ते म्हणाले. दरम्यान, २४ ऑगस्टपासून पर्युषण कार्यक्रम स्वाध्याय भवन येथे होतील. त्यात अंतगढ सूत्र व पर्युषणपर्व यांचा काय संबंध आहे? अंतगढ सूत्राचे वाचन का करावे? त्याच्या वाचनाने काय फायदे मिळतात? पर्युषण काळात श्रावक-श्राविकांनी अंतगढसूत्राचे वाचन करावे, असे आवाहन डॉ. पदमचंद्रमुनी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...