आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:कंत्राटदारांची बिले थकली; आज आंदाेलन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यात शासकीय कंत्राटदारांनी दिवाळीपूर्वी केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांची बिले थकली आहेत. या थकलेल्या बिलांमुळे कंत्राटदारांचे पुढील कामांचे नियाेजन, मजुरी, बंॅकेची कर्ज यांचे नियाेजन विस्कळीत झाले आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शासकीय कंत्राटदार संघटनेतर्फे शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापुढे लक्षवेधी आंदाेलन करण्यात येणार आहे. तसेच निवेदन देण्यात येणार आहे.

शासकीय याेजनांच्या कामांची प्रलंबित बिले दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावी अशी मागणी कंत्राटदारांकडून करण्यात आली हाेती; परंतु दिवाळी हाेऊनदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांची बिले काढण्यात आलेली नाही. शासनाची ही कृती म्हणजे कंत्राटदारांची चेष्टा असल्याचा आराेप कंत्रटादार संघटनेकडून केला जात आहे. या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी कंत्राटदारांकडून ४ आॅक्टाेबर राेजी सार्वजनिक बांधकाम विभागापुढे लक्षवेधी आंदाेलन केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे.

सरकार बदलूनही कंत्राटदारांच्या बिलांचा गाेंधळ कायम राज्यात सरकार बदल हाेऊन देखील आधी हाेत असलेला शासकीय कंत्राटदारांच्या बिलांचा गाेंधळ कायम आहे. यावर ताेडगा निघू शकलेला नाही. यापूर्वी काेराेनात शासकीय कामांच्या बिलांना कात्री लावण्यात आली हाेती. तर आता वेळेवर बिले काढली जात नसल्याचे त्रस्त झालेल्या कंत्राटदारांनी आता आंदाेलन करण्याच्या पवित्र्यात आहे.

बातम्या आणखी आहेत...