आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१०० वर्षांपेक्षा जास्त वाटचाल करणाऱ्या रोटरीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा सन्मान महिलेला प्राप्त झाला. ही गाैरवाची बाब आहे. रोटरीच्या कार्यात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन महिला प्रांतपाल आशा वेणुगोपाल यांनी केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे रोटरी भवनात तेजस्विनी रोटरी सन्मान सोहळा नुकताच झाला.
व्यासपीठावर सहप्रांतपाल अरुण नंदर्षी, अध्यक्ष सुनील सुखवानी, मानद सचिव विवेक काबरा, प्रकल्प प्रमुख मुनिरा तरवारी उपस्थिती होत्या. परिचय दीप्ती पिंपलीकर, अश्विनी दशपुत्रे, जया काबरा, प्रा. तनुजा महाजन यांनी करून दिला. प्रास्ताविक सुनील सुखवानी यांनी केले. सरिता खाचणे यांनी सूत्रसंचालन केले. रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष नितीन रेदासनी, रमण जाजू, योगेश भोळे, अनंत भोळे यांनी नियोजन केले.
या महिलांचा झाला सन्मान
कार्यक्रमात उज्ज्वला वर्मा, विद्या बेंडाळे, सुमन लोखंडे, हर्षाली चौधरी, अर्चना महाजन, शोभा तायडे, कोकिळाबाई पाटील (लोंढे, ता. चाळीसगाव), नीलम बोंडे, वैशाली पाटील (दसनूर, ता. रावेर), स्वतः रुग्ण असतानाही कॅन्सर रुग्णांसाठी कार्य करणारी महिला आदी १० महिलांना तेजस्विनी रोटरी सन्मान २०२३ ने सन्मानित करण्यात आले. तसेच मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे काैतुक देखील केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.